शहर सिटी बस वाहकाकडून महिलांना अपमान्सपद वागणूक, घटनेची चौकशी करून वाहक व गुत्तेदारावर कारवाई करा:शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेने दिले मनपा आयुक्तांना निवेदन.


Adiwasi kranti Marathi news 

लातूर प्रतिनिधी,

लातूर शहरात मनपाच्या वतीने महिलासाठी मोफत शहर सिटी बस सेवा सुरू करण्यात आलेले आहे या सिटी बस मधून महिला मोठ्या प्रमाणात प्रवास करत असून सिटी बस अनेक थाब्यावर थांबत नसल्याने त्याचा नेहमीप्रमाणे रोजच महिलांना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच काही महिला पाच नंबर चौक ते गंजगोलाई मार्गावर रात्री सात वाजता शिटी बसने प्रवास करत असताना या बसमधील वाहकाने तिकीट देताना धक्के देत आसल्याने महापालिकेणे बायकांना फुकटचा प्रवास सुरू केलेला पासून वैताग आला असून बिनकामाच्या महिला सतत या बसमधून प्रवास करत आहेत. आणि वाहक हीन दृष्टीने अत्यंत संताप जनक नजरेने बोलत आहेत याचा महिलांना त्रास सहन करावा लागत असून संबंधित सिटी बस वाहकावर व कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिव सम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या मराठवाडा महिला अध्यक्ष कावेरी विभूते यांनी महापालिका आयुक्त यांना आजदि 23 मे रोजी निवेदन दिले आहे.


याप्रसंगी निवेदन देताना माजी नगरसेविका अर्चना आल्टे, सत्यभामा दामवाले, नंदा अंकलकोटे, ज्योती भालेराव, सरस्वती पांचाळ, शुभांगी सगर, सुवर्णा सुरवसे यांच्यासह शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...