डॉ गोजमगुंडे हॉस्पिटलमधील रुग्णमृत्यू प्रकरणाची निपक्षपातीपने चौकशी करा रुग्ण हक्क संरक्षण समितीची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी..


...समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी, व रुग्ण नातेवाईक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांनां प्रत्यक्ष भेटून केली मागणी...

लातूर:- लातूर शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉ किरण गोजमगुंडे यांच्या गोजमगुंडे हॉस्पिटल मध्ये दि.17 जुलै रोजी औसा तालुक्यातील बुधडा येथील रमण आलगुले या तरुणाचा हाथाच्या हाडाचे  शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाला. सदर रुग्णाचा मृत्यू हा अस्थीरोग तज्ञ डॉ किरण गोजमगुंडे आणि भूलतज्ञ डॉ अतिक सय्यद यांच्या निष्काळजी पणा मुळे झाला असल्याचा आरोप रुग्णनातेवाईक यांनी करत दि 18 जुलै रोजी गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार नोंदवली आहे. सदर रुग्ण मृत्यू प्रकरणाची 


निपक्षपातीपने चौकशी करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन  पोलीस अधीक्षक यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनंती वरून रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी यांनी दिले यावेळी समितीचे पदाधिकारी आणि रुग्ण नातेवाईक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी करण्याची विनंती केली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे महिला प्रदेश अध्यक्ष रेणुका बोरा, जिल्हा उपाध्यक्ष राम चिलमे, मयत रुग्णाचे नातेवाईक

अतिश अलगुले, निवृत्ती अलगुले., विक्रम अलगुले, रुपेश अलगुले, सुमित बोंबडे, आकाश थोरमोटे, शुभम पिनाटे, बालाजी मिठापल्ले, आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...