जाणिव सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते मनोज पाटील यांच्याकडे उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडीतील काही विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक अडचण व्यक्त केली, त्यानंतर उलवे येथील जाणिव सेवाभावी संस्थेशी संपर्क साधून मदतीचे आवाहन करताच उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी वाडीतील ईयत्ता ८ वी, ९ वी, आणि १० वीत शिकत असलेल्या दहा विद्यार्थ्यांना वह्या व एक्झाम पँड जाणीव संस्थेचे सभासद रंजिता मांडवीकर आणि सुहास मांडवीकर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.यावेळी मनोज पाटील यांनी जाणीव सेवाभावी संस्थेचे आभार मानून पुनाडे वाडीतील विद्यार्थ्यांच्या सर्व शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून कार्यरत असून यापुढेही प्रयत्नशिल राहू, ईतरही सामाजिक संस्था व समाजसेवकांची मोट बांधून विद्यार्थ्यांना सर्वोपरि सहकार्य करत राहू असे मत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी जाणिव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकूर, किरण मढवी, चिंतेश पाटील, अनिश पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...