भोकर नगरपरिषचा अजब गजब कारभार..

भोकर (प्रतिनिधी) शासनाने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या कारभारावर अंकुश रहावे यासाठी बऱ्याचशा नियमावली निर्माण केल्या परंतु काही अधिकारी कर्मचारी त्यातून पळवाटा काढण्याचा नेहमीच प्रयत्न करतात अशीच घटना एक भोकर नगरपरिषदे येथे घडली असून
पत्रकार शेख एजास शेख महेबूब यांनी न.प. कार्यालय भोकर येथे “स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाची” माहिती दिनांक 26/06/2025 रोजी मागीतली होती; परंतु जन माहिती अधिकारी न.प. कार्यालय भोकर यांनी सदर माहिती आज देतो उद्या देतो असे म्हणुन टाळाटाळ करित सदर माहिती अर्जदारास दिली नाही. त्यामुळे अर्जदाराने माहिती मिळण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा देताच जन माहिती अधिकारी व मुख्याधिकारी न.प. कार्यालय भोकर यांनी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाची माहिती न देता अर्जादाराची दिशाभुल करण्यासाठी त्यांना चुकीची माहिती देण्याकरीता “घनकचरा व्यवस्थापण विभागाची” माहिती देण्याकरिता गुत्तेदारास पत्र काढले जी माहिती मागली ती माहिती मिळत असल्यावर संतापलेल्या अर्जदाराने जी माहिती दडवण्यात आली त्यामध्ये मोठा घोटाळा असू शकते नगरपरिषदेतील त्या विभागामधील सर्व संबंधित त्या घोटाळ्यामध्ये शामिल असू शकते मागितल्याप्रमाणे रीत सर माहिती नाही मिळाली तर  दिशाभूल करणारे जन माहिती अधिकारी व मुख्याधिकारी न.प. कार्यालय भोकर यांच्यावर कार्यावाही करण्याकरीता व इतर मागण्या करिता  पत्रकार शेख एजास पि. शेख महेबूब हे दिनांक 12/08/2025 रोजी मा. उपविभागीय अधिकारी साहेब भोकर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...