नांदेडमध्ये एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त; तिघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नांदेडमध्ये एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस

जप्त; तिघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड (प्रतिनिधी)- शहराच्या आंबेडकरनगर

भागात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर

असताना त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची

अंगझडती घेतली असता एकाजवळ बाळगत

"असलेल्या विनापरवाना गावठी पिस्तूल आणि दोन

जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तर दोघांकडून

दोन खंजर अशा तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस

ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पाहिजे फरारी असलेले आरोपी हद्दपार

व अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी, जेल रिलीज,

आरोपी तसेच अवैधरित्या शस्त्र व अधीशस्त्र ताब्यात

बाळगणारे आरोपी, मालाविरुद्ध व शरीराविरुद्ध गुन्हे

करणारे गुन्हेगार यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याकरिता

नांदेड जिल्ह्यात कोम्बींग ऑपरेशनचे आयोजन केले

होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस

निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस

उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांची टिम ही

पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत कोम्बींग ऑपरेशन

करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीवरून

आंबेडकरनगर भागातून अनिल ऊर्फ भुऱ्या सुधाकर

गच्चे (वय २३) याचेकडून एक अनीशस्त्र (पिस्तूल)

व दोन जिवंत काडतूस तसेच तेहरानगर भागातून

शुभम ऊर्फ शिवा जालिंदर दवणे (वय २४), शुभम

पंढरी गायकवाड (वय २३) या दोघांकडून दोन

खंजीर पंचांसमक्ष जप्त केले आहे. त्या संबंधाने

पोलीस स्टेशन शिवाजीनगर, नांदेड येथे वरील नमूद

प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील

तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...