भोकर येथील गाव तलावाचे काम शारदा कन्स्ट्रक्शन निकृष्ट दर्जाचे;चौकशीची मागणी

 


                         प्रतिनिधी / माली पाटील 

• भोकर येथील महादेव मंदिर समोरील जुन्या गाव तलावाच्या पुनर्जीवन व सुशोभीकरणाच्या विकासासाठी हे काम शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू झाले असून सदरील सुशोभीकरणाचे व पुर्नरुज्जीवन काम हे अत्यंत निकृष्ट व बोगस होत आहे.सदरील काम अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगणमतानी थातुर मातुर काम होत असल्याने या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

       महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागा अंतर्गत भोकर शहरातील महादेव मंदिर परिसरातील जुन्या गाव तलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभीकरणचे टेंडर शासनाने या तलावाचे काम नांदेडच्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.या तलावाचे काम निकृष्ट पद्धतीने होत आहे.या तलावाची खोलीकरण व साइड पिचिंग साठी लागणारे दगड व इतर साहित्य अल्प प्रमाणात चुरा मिश्रीतने भरुन ते पण थातुरमातुर लावल्या जात असून तलावात कित्येक वर्षापासून साचलेले गाळ पूर्णपणे काढण्यात आलेले नसल्याने खोलीकरणाचे काम पाहिजे तसे करण्यात आले नाही. जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे खोली कमी असलेला तलाव तुडुंब भरल्यासारखा दिसत आहे. सदरील गाव तलावाचे सुशोभीकरण व पुर्नरुज्जीवन करण्याऐवजी ते विद्रुपीकरणच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थातुर मातुर काम करून शासनाच्या निधीचा संबंधित अधिकारी व गुत्तेदार संगणमत करुन गुणवत्तेची पारदर्शक न ठेवता बोगस काम करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत कामाची विल्हेवाट लावत आहेत.मलईच्या अधिन गेलेल्या तलावाच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.या जुन्या गाव तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करुन विकास साधण्यासाठी करोडो रुपयाचे काम असलेल्या गावात तलावाचे काम निकृष्ट पद्धतीने केले जात आहे.त्यामुळे या कामात पारदर्शकता व गुणवत्ता नसल्याने बोगस व थातुरमातुर करण्यात आलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

______________________________________________

       महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागा अंतर्गत भोकर शहरातील महादेव मंदिर परिसरातील जुन्या गाव तलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभीकरण करण्यासाठी शासनाने २८.५४ कोटी रुपये मंजूर झाले.या तलावाचे दि.१७ ऑगस्ट २०२४ रोजी या तलावाच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.या तलावाचे काम नांदेडच्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले.या तलावाचे काम निकृष्ट पद्धतीने होत आहे.या तलावाची खोलीकरण व साइड पिचिंग साठी लागणारे दगड व इतर साहित्य अल्प प्रमाणात ते पण थातुरमातुर लावल्या जात असून तलावात कित्येक वर्षापासून साचलेले गाळ पूर्णपणे काढण्यात आलेले नसल्याने खोलीकरणाचे काम पाहिजे तसे करण्यात आले नाही. जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे खोली कमी असलेला तलाव तुडुंब भरल्यासारखा दिसत आहे. सदरील गाव तलावाचे सुशोभीकरण व पुर्नरुज्जीवन करण्याऐवजी ते विद्रुपीकरणच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थातुर मातुर काम करून शासनाच्या निधीचा संबंधित अधिकारी व गुत्तेदार संगणमत करुन गुणवत्तेची पारदर्शक न ठेवता बोगस काम करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत कामाची विल्हेवाट लावत आहेत.मलईच्या अधिन गेलेल्या तलावाच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.या जुन्या गाव तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभीकरण करुन विकास साधण्यासाठी करोडो रुपयाचे काम असलेल्या गावात तलावाचे काम निकृष्ट पद्धतीने केले जात आहे.सदरील काम नकाशा,आराखडा, डिझाईन व अंदाजपत्रक या नुसार काम होत नसल्याची अनेकांच्या तक्रारी असून संबंधित ठेकेदाराने घाई गडबडीत काम उरकत असल्याचे निदर्शनात येत आहे.त्यामुळे या कामात पारदर्शकता व गुणवत्ता नसल्याने बोगस व थातुरमातुर करण्यात आलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून गुत्तेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...