सोनारी तांडा येथील अल्पवयीन मुलीवर दोन नाराधमांकडून अत्याचार


भोकर (प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे सोनारी तांडा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची निंदनीय घटना दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री ०९ वाजताच्या सुमारास घडली असून दि. १५ सप्टेंबर रोजी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात माहिती अशी की   याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, मौजे सोनारी तांडा येथे राहत असलेल्या एका कुटुंबातील १५ वर्षीय अलपवयीन पिडीत मुलगी गणेशोत्सव चालू असल्याने ती तिच्या आईवडील व गावातील लोकांसोबत एका टेम्पोत दिनांक १४ सप्टेंबर रोजी सुमारे सात वाजता पाळज येथे गेले.या ठिकाणी गणरायांच्या दर्शनासाठी खूप गर्दी होती त्या गर्दीत या मुलने रांगेत दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येऊन आईवडिलांची वाट बघत थांबली असता तिच्याच गावातील (सोनारी तांडा)गावातील घरा शेजारी असणारा शंकर ऊर्फ कोंडीबा उत्तम पवार हा पिडीत मुलीस आकाशी पाळणा खेळण्यास येण्याची विनवनी करत असताना तीने नकार देताच बळजबरी तीचे हात पकडून त्याचा मित्र कुणाल राठोड याच्या टेम्पो कडे घेऊन गेला. तेथे कुणाल राठोड हा आगोदरच उपस्थित होता.दोघांनी त्या मुलीस बळजबरी टेम्पोत टाकून अश्लील चाळे करत असताना त्या पिडीतेने मला जाऊ द्या म्हणून आरडाओरडा करीत विनवणी करत असताना तिच्यावर तोंड दाबून आळीपाळीने अनन्वित दुष्कर्म करण्यात आले.ही घटना  दि. १४ सप्टे च्या रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली आहे..



      दरम्यान "त्या" पिडीत मुलीचे आईवडील देव दर्शनानंतर आपली मुलगी मंदिराबाहेर कुठेच दिसत नसल्याने तिचा शोधाशोध करीत असताना त्या  टेंपोजवळ दिसली.आरोपितानी सदरील घडलेली घटना कोणाला सांगितल्यास तुला जिवे मारू अशी धमकी दिल्याने पिडितेने घाबरून,ही घटीत घटना कुणासही  सांगितली नाही मात्र  परत घरी आल्यानंतर  पिडीतेच्या पोटात दुखायला सुरू झाल्याने मुलीने तीच्या काकुस ही घडलेली सर्व घटना सांगितल्याने सर्व कुटुंबियांना माहिती झाली तेव्हा त्यांना एक प्रकारचा धक्काच बसला त्यातून सावरत त्यांनी मुलीवर उपचार केले दुसऱ्या दिवशी दि. १५ रोजी येऊन भोकर पोलीस स्टेशन येथे पिडीत मुलीने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यावरून भोकर पोलीसांनी आरोपी नामे शंकर ऊर्फ कोंडीबा उत्तम पवार व कुणाल राठोड या सदरील आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहीता नुसार, गुन्हा रजिस्टर नंबर ३४३ / २०२४ कलम ७०(२), १३८, ३५१(२)(३), ३, (५)  सहकलम ४, ८, १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरील तपास पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनानुसार स. पो. नि. कल्पना राठोड हया पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...