उमरी येथे भीमा कोरेगाव शौर्य दिवस व नामविस्तार दिनाची बैठक संपन्न.....

 


उमरी तालुका  प्रतिनिधी/ कैलास सोनकांबळे एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिवस व 14 जानेवारी मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त उमरी शहरांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये एक जानेवारी भीमा कोरेगाव व 14 जानेवारी मराठवाडा नामविस्तार दिन संयुक्त रित्या या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे ठरवण्यात आली

 कार्यक्रमाचे पहिले सत्र दि. 1.जानेवारी 2023 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक भोकर रोड येथील पंचशील ध्वजारोहण सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी संपन्न होईल व 11वाजता विजय स्तंभाची भव्य  रॅली निघून शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रमण करत नगरपरिषद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी या रॅलीचे जाहीर सभेमध्ये रूपांतर होईल 

कार्यक्रमाची दुसरे सत्र दि. 14 जानेवारी 2023 रोजी मराठवाडा नामविस्तार दिन निमित्त  नगरपरिषद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी पंचशील ध्वजारोहण सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी संपन्न होईल त्यानंतर नामांतर लढ्यात शहीद झालेल्या वीरांना  मानवंदना व अभिवादन  करण्यात येणार आहे 

 कार्यक्रमाचे तिसरा सत्र दि. 17 जानेवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले सदरील ही बैठक गंगाधर सवई आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा पत्रकार  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली 

यावेळी अनिल सोनकांबळे उपनगराध्यक्ष ईश्वर सवई  माजी नगरसेवक  अरुण भद्रे उपनगराध्यक्ष कैलास सोनकांबळे पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार राजेश सवई माजी नगरसेवक पांडुरंग सोनकांबळे पत्रकार संजय देवके उमेश जोंधळे आधी सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...