बेवारस रुग्णाचा मदतीसाठी रुग्ण हक्क संरक्षण समितीने घेतला पुढाकार..

 


लातुरः-  संपुर्ण महाराष्ट्रात रुग्ण हक्काच्या संरक्षणार्थ कार्य करणारी रुग्ण हक्क संरक्षण समिती हि रुग्ण सेवेकरिता प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहे.लातुर शहरातील गोलाई मध्ये एका लॉज समोर बेशुद्ध पडलेला एक रुग्ण समिती पदाधिकारी यांच्या निदर्शनास आला यावेळी  सदर रुग्णास नागरिकांचा मदतीने तिरुपती हॉस्पिटलमध्ये उपचाराकारिता दाखल केले. दाखल केल्यावर सदर रुग्णास कोणिही देखभाल करणारा नातेवाईक नाही हे लक्षात आले यानतंर दुसऱ्या दिवशी सादर रुग्णाचे एकदिवसीय बिल सहा हजार रुपये व औषध गोळ्याचे पाच हजार पाचशे रुपये झाले होते सदर पैसे कोण भरणार हा प्रश्न निर्माण झाल्याणे ॲड.धनजंय मस्के आणि  राहुल मामडगे, यशपाल पाचपिंडे यांनी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रमुख ॲड.निलेश करमुडी यांच्याशी संपर्क साधुन रुग्णास समिती मार्फत मदत करणेबाबत विनंती केली यावेळी ॲड करमुडी व समितीचे विधी सल्लागार ॲड.अभय पाटील यांनी तात्काळ हॉस्पिटलचे डॉक्टर यांना प्रत्यक्ष भेटुन रुग्ण हा बेवारस असुन त्यला मागे पुढे कोणीही नाही म्हणून बिल कमि करुन देणेबाबत डॉक्टरांना विनंती केली डॉक्टरांनी समितीच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत एकुन बिलातुन रक्कम कामि करुन दिली व उरलेली रक्कम समितीच्या पुढाकारातुन भरुन रुग्णाला शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथै पुढील उपचारासाठी स्थलांतरीत केले शासाकिय रुग्णालयात बेवारस रुग्णाची प्रकृती मध्ये सुधार होत असल्याची माहीती आली आहे. रुग्णसेवे सोबतच मानवधर्म सेवा कार्य करणारे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सर्व लातुर टिमचे अभिनंदन व सदर कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व रुग्णहितचिंतकांचे आभार  समितीचे प्रमुख ॲड.निलेश एस.करमुडी,प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला प्रदेशअध्यक्षा रेणुकाताई बोरा, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे,प्रदेश संघटक नरेंद्र बोरा,मराठवाडा महिला अध्यक्षा पुजाताई निचळे, विधी सल्लागार ॲड.अभय पाटील, लातुर जिल्हाध्यक्ष दिपक गंगणे, महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते,औसा तालुकाध्यक्ष शिवकुमार मुरगे, निलंगा तालुका कार्याध्यक्ष प्रशांत साळुंके,निलंगा शहरअध्यक्ष राहुल हातांगळे, अहमदपुर तालुकाध्यक्ष त्रिशरण वाघमारे,उदगीर तालुकाध्यक्ष बळवंत चिंचोले,चाकुर चापोली प्रमुख प्रदिप कचरे,शहर संघटक कृष्णा राठोडकर, ॲड.नितीन सोदाघर आदीनी आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...