मौजे निमगांव येथील विद्युत लाईनची दुरावस्था झाली असुन त्वरीत सुधारणा करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा नागरिकांची मागणी..

 

 नांदेड :- मौजे निमगांव ता.अर्धापूर जि.नांदेड येथील विद्युत पुरवठाची अत्यंत दुरावस्था झाली असुन गावातील एकही डि.पी. सुरळीत नाही . संपुर्ण गावातील विद्युत पोलची तार पुर्णपणे लोंबाकाळलेले आहेत व विद्युत तारे एकमेकांना भिडत आहेत व काही विद्युत पोलवरील विद्युत तार तर तुटून पडण्याचा स्थितीत आहेत. हे की , गावासाठी नियुक्त केलेला विद्युत कर्मचारी हा गावात येत नाही व कोणतेही विद्युत तारेची किंवा डि.पी.ची दुरुस्ती करत नाही . त्यामुळे ऐन सणा सुदीच्या दिवसात गावात अंधकार होत आहे . वारंवार डि.पी. वरील फेज उडत आहेत . डि.पी. पुर्णपणे खराब झालेले आहेत . आपल्या विद्युत कर्मचारी व आपणांकडे वारंवार मागील ६ महिन्यांपासून तक्रार करूनही अद्यापही गावातील विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नाही . तसेच गावातील सर्व प्रतिष्ठीत नागरीक , सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील , कृ.बा.स. संचालक व जेष्ट नागरिकांनी अर्धापूर सब स्टेशन येथील उप कार्यकारी अभियंता यांना ही बाब लक्षात आणुन दिल्यानंतरही ते मुद्दामहून याकडे दुर्लक्ष करीत आहेत व उडवा - उडवीची उत्तरे देत आहेत .. तरी मे . साहेबांना नम्र निवेदन करण्यात येते की , त्वरीत गावातील विद्युत पोलवरील लाईन चांगल्याप्रकारे ओढून घ्यावी व बिघाड झालेल्या डि.पी. ची दुरूस्ती करून त्वरीत गावाला सुरळीत विद्युत पुरवठा करून द्यावा व २४ तास गावात उपस्थित राहून सेवा देण्यासाठी योग्य कर्मचारी नियुक्त करावा अशी मागणी सिताराम जयवंद्रराव भिसे (पिठाची गिरणी चालक) वस्त कल्याण गंगाराम मोळके , वसंत रामधन चव्हाण , संचालक -कृ.उ.बा.स.हदगांव मी सरपंच निमगांव माजी तंटामुक्ती अध्यक्ष, संजय पुरमाजी मोळके व अन्य नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...