बहुभाषीक पत्रकार संघातर्फे पोलिस निरिक्षक उबाळे यांचा सत्कारभोकर:(प्रतिनिधी) येथे नवनियुक्त पोलिस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांचा बहुभाषिक पत्रकार संघाकडुन दि २६ फेब्रुवारी रोजी शाल पुष्पहार घालुन भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार अहमदभाई करखेलीकर यांनी मनोगत व्यक्त करताना शहर तसेच तालुक्यातील समस्यांविषयी चर्चा केली तसेच मिलिंद गायकवाड यांनी देखिल मनोगत व्यक्त केले.तर पोलिस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांनी बहुभाषिक पत्रकार संघाच्या आभार व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अमोल पोलादवार. पत्रकार विजय मोरे.अदिवासी क्ररती
मराठी न्यूज चॅनल संपादक
भिम टायगर सेनाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड. पत्रकार चौधरी. पत्रकार राहुल सोनकांबळे. पत्रकार सुनिल पवार लामकानीकर. पत्रकार मोहम्मद इलीयास. पत्रकार अनिल कराळे. पत्रकार गिरी.पत्रकार गोतम सरपाते. गंगाधर नकलवाड यांच्यासह मोठ्या प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.