धनगर समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा चराई क्षेत्र उपलब्ध करून पारंपरिक व्यवसाय वाचवा



ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री नंदू भाऊ लवंगे यांनी माननीय जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून अनेक निवेदने देऊन सुद्धा शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून आता आम्हाला आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून आक्रोश केल्याशिवाय पर्याय उरला नाही त्यानुसार येत्या 12 ऑगस्ट 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे या मोर्चामध्ये धनगर बांधव आपल्या कुटुंब व मूलबाळे मेंढ्यांच्या वाड्यासहित बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करणार आहेत त्यामुळे जर रहदारीला अडचण झाली तर याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील उपवन अधिकारी बुलढाणा प्रधान मुख्य वन संरक्षण वन्यजीव नागपूर यांच्या दालनात जाऊन सविस्तर निवेदन देऊन सखोल चर्चा करून सुद्धा कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे मेंढपाळ बांधव यांच्या मेंढ्या वनपरिक्षेत्रातून बाहेर काढल्या गेल्या आहेत आता या मेंढ्या कोठे जाणार त्यामुळे ह्या मेंढ्यांची व्यवस्था काय करायची हे शासनाने तात्काळ ठरवावे येत्या 12 ऑगस्ट 2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चासाठी जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व मेंढपाळांनी मोर्चास हजर राहून सहकार्य करावे असे आवाहन ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना चे प्रदेश अध्यक्ष नंदू भाऊ लवंगे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष शारदाताई पांढरे विदर्भ अध्यक्ष सौ गीता ताई सोनोने यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...