आ. संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे नवखा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह.भ.प.माधवराव इंगोले महाराज यांचे कीर्तन,मौजे कळमकोंडा बु.येथे शिव महापुराण ज्ञानयज्ञ व नामजप सोहळ्या निमित्त ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांचे कीर्तन व मौजे उमरा येथे ह.भ.प.ज्ञानेश महाराज यांचे कीर्तन मोठ्या भक्तीभावात संपन्न....!!!*


*मौजे उमरा येथे चैतन्य कानिफनाथ मंदिर सभामंडपा साठी 10 लक्ष रुपये निधी,भवानी माता मंदिर सभामंडपासाठी 10 लक्ष रुपये निधी व स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये निधी तसेच मौजे नवखा येथे  रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये,2 वर्गखोल्या व अंगणवाडी साठी विकासनिधी  तातडीने देणार*
               *- आ.संतोष बांगर*

*आ.संतोष बांगर साहेब यांनी मौजे नवखा येथील बाल भजनी मंडळाला भजन साहित्यासाठी 21 हजार रुपये  दिली वर्गणी....!!!*

आज *हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजे नवखा येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह.भ.प.माधवराव इंगोले महाराज यांचे कीर्तन,मौजे कळमकोंडा बु.येथे शिव महापुराण ज्ञानयज्ञ व नामजप सोहळ्या निमित्त ह.भ.प.अर्जुन महाराज लाड यांचे कीर्तन व मौजे उमरा येथे ह.भ.प.ज्ञानेश महाराज यांचे कीर्तन मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले.*
       यावेळी *आमदार संतोष बांगर साहेब बोलताना म्हणाले की सर्वांनी आपापल्या आई-वडिलांची व कुटुंबीयांची काळजी घ्यावी तसेच व्यसनाधीनते पासून दूर राहून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे अशी विनंती उपस्थित भाविकांना केली. यावेळी आमदार संतोष बांगर साहेब यांनी मौजे उमरा येथे चैतन्य कानिफनाथ मंदिर सभामंडपा साठी 10 लक्ष रुपये निधी,भवानी माता मंदिर सभामंडपासाठी 10 लक्ष रुपये निधी व स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये निधी तसेच मौजे नवखा येथे  रस्त्यासाठी 10 लक्ष रुपये,2 वर्गखोल्या व अंगणवाडी साठी विकासनिधी देणार असल्याचे जाहीर केले तसेच मौजे नवखा येथील बाल भजनी मंडळाला भजन साहित्यासाठी जागेवरच 21 हजार रुपये वर्गणी दिली.*
            यावेळी सुभाषराव बांगर,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,काशिनाथराव बांगर,राजू नागरे,पंढरी मगर,भुजंगराव भगत,दिंडे मामा,मयूर शिंदे,हनुमान कामखेडे,अमोल घुगे,विवेक घुगे,संदीप घुगे,अरविंद कुरवाडे,बाळासाहेब घुगे,राजीव गाढवे,सुभाष घुगे,विश्वास घुगे,शंकर डाळ,प्रभाकर घुगे,ज्ञानेश्वर गाढवे,विष्णू पातळे,कुंडलिक हाके,प्रभाकर हाके, परमेश्वर पोले,श्यामराव गिळवरकर, सतीश पातळे,माधव पोले,मारोती पोले,नागोराव पोले व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...