भोकर तालुक्यात मोटारसायकल वर अवैध गुटखा विक्री वाढली...

भोकर : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही भोकर तालुक्यातील ग्रामीण शहरी भागात पानटपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र भोकर शहरात दिसून येत आहे.तेव्हा शहरात गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे विकल्या जाणारा गुटखा हा चढ्या भावाने विकल्या जात असून, अनेक जण यामधून मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे.


गुटखाबंदीचा कायदा करून सरकारने गुटखाविक्री तसेच उत्पादन व वाहतूक यांवर निर्बंध लादले.कायदा न मोडता तो पद्धतशीरपणे वाकविण्याची वृत्ती असलेल्या महाभागांनी सुपारी व तंबाखू आशा दोन पुड्या तयार करून यापासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. सरकारने तोही हाणून पाडत अशा प्रकारच्या उत्पादनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र,हे आदेश झुगारून लावत अर्थपूर्ण संबंध व्यावसायिकांनी तयार करीत अशा उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली आहे.शाळा तसेच महाविद्यालय परिसराच्या १०० मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास तसेच सेवन करण्यास बंदी असतानाही शाळा व विद्यालयाजवळच्या अनेक दुकानांतून गुटखाविक्री सुरू आहे. शाळकरी मुले व महाविद्यालयीन तरुणांमध्ये या व्यसनाचे प्रमाण वाढत असून डोळेझाक करणारी सरकारी यंत्रणा याला कारणीभूत असल्याचे मत अनेक पालकांनी ‘अदिवाशी क्रांती मराठी न्यूज’शी बोलताना व्यक्त केले.पानपट्टी किंवा दुकान वजा घराचा आसरा घेऊन मोठ्या गावांमध्ये गुटखाविक्री होत आहे. सध्या तर हॉटेल, किराणा दुकानांतही खुलेआम गुटखाविक्रीने स्वरूप धारण केले आहे. दूधविक्रेतेदेखील गुटखाविक्री करतानाचे चित्र दिसून येत आहे. लहान मुले व तरुण याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते.काही पानटपरीधारक तंबाखू,सुगंधी सुपारी व इतर घातक रसायनांचे मिश्रण करून ओला मावा प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून विकत आहेत.या कडे लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे अशी भोकर तालुक्यातील नागरिकांनाची मागणी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...