एसटी डेपो नांदेड आगाराच्यावतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गंत कामगार- कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजांचे मोफत वाटप

 


नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार (एसटी डेपो) नांदेड येथे दि. ९ ऑगस्ट २०२२,मंगळवार रोजी विभागीय उपयंत्र अभियंता (चालन) तथा प्रभारी आगार व्यवस्थापक मा. श्री. मंगेश कांबळे यांच्या  मार्गदर्शनाखाली आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा. श्री. संदीप गादेवाड यांच्या हस्ते हर घर तिरंगा याराष्ट्रीय अभियानांतर्गंत बांबूसह दोनशे राष्ट्रध्वजांचे आगारातील कामगार, कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.यावेळी चार्जमन विष्णुकांत हरकळ, श्रीनिवास रेणके,एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्तसामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच.मिसलवाड, पाळी प्रमुख मा. श्री. नागोराव पनसवाड, वरिष्ठ लिपीक श्री.राजेश गहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आगारातील सर्व कामगार, कर्मचारी बंधु-भगिणींना केंद्र सरकार व राज्य सरकारने घोषित केलेल्या हर घर तिरंगा या राष्ट्रीय अभियानात आवर्जुन सहभाग घ्यावा वप्रत्येकाने आपल्या घरावर ध्वजारोहण करुन हा राष्ट्रीय आनंदोत्सव साजरा करावा यासाठी जनजागृती केली.भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकाच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत राहाव्यात यासाठी दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान हर घर तिरंगा हा राष्ट्रीय आनंद महोत्सव सर्व कामगार-कर्मचारी बंधु भगिणींनी मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन यावेळी मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. यावेळी राष्ट्रध्वज वाटपासाठी सौ. श्वेता तेलेवार,आशा डोईबळे,श्री. राजेंद्र निळेकर, श्री. गजानन

देगावे, श्री. मंगेश झाडे, श्री संतोष स्वामी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...