भोकर शहरातील महा-ई-सेवा केंद्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना सोयीचे उपलब्ध करून द्या,

प्रहार क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा

भोकर ता. प्रतिनिधी 
भोकर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रा बाबत गेल्या अनेक वर्षापासून तक्रारी असून अनेक तक्रारी कार्यालयात धुळखात पडल्याची चित्र पाहावयास मिळत आहे. भोकर तहसील कार्यालयाच्या बाजूस दोन महा-ई-सेवा केंद्र स्थापित असून दोन्ही सेवा केंद्र हे वरच्या मजल्यावर अतिशय अरुंद लोखंडी शिड्या असल्याने या ठिकाणी दिव्यांग,वृद्ध,जेष्ठ नागरिक यांना वर चढून सुविधा केंद्रात जाताच येत नाही. सुविधा केंद्राच्या दर्शनी भागावर दर पत्रक लावलेले नाही. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगानां वर चढून सुविधा केंद्रात जाता येत नसल्यामुळे. त्यांचे कामे करण्यासाठी त्या ठिकाणी दलाल उपलब्ध आहेत. अशा कामांसाठी सामान्य जनतेची दलालांकडून आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे.या बाबत गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, वृद्ध, दिव्यांग, यांनी भोकर तहसील कार्यालयास शेकडो वेळा लेखी व तोंडी तक्रारी दिल्या परंतु सदरील सेतू सुविधा केंद्र हे जागचे का हालले नाही.झालेल्या तक्रारींचे काय निराकरण झाले यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काही कार्यवाही केली की नाही या बाबद, कोणी काही सांगायला तयार नाही. या पूर्वी अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक वृद्ध व्यक्ती व अनेक दिव्यांग बांधवांनी तोंडी तक्रारी केल्या परंतु काहीच मार्ग निघत नसल्याने ,प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश चंद्रे यांनी उपविभागीय अधिकारी भोकर यांना निवेदन देऊन तात्काळ जेष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी  सुलभ असे महा-ई-सेवा केंद्र उपलब्ध करून द्यावे अन्यथा दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने दिव्यांग व जेष्ठांना सुलभ  असे ई-सेवा केंद्र मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने भोकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे . निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख राजू इबितवार, एम.डी सोनकांबळे, बालाजी कोकणे , दत्ता बोईनवाड, विठ्ठल जुजूकर, खंडू दाढेराव, परमेश्वर गायकवाड, अमोल भालेराव या दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...