सरकारने रुग्णांची मरण यात्रा थांबवावी आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवावी..अँड निलेश एस करमुडी संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र


लातूर:- राज्यभरातील रुग्णालयांत अनेक वर्षांपासून रुग्णमृत्यूच्या दुर्घटना वारंवार होत आहेत. हि बाब निंदनीय आहे.  सरकारीसह खासगी रुग्णालयांमध्ये किंड्यामुंगी सारखी माणसे  मरत आहेत. काही वर्षा पूर्वी भंडारा रुग्णालयात कोवळी बालके तडफडून मरण पावली होती ही घटना महाराष्ट्रातील जनता अजून विसरली नाही. एकट्या महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षभरात रुग्णालयांतील आगीत होरपळून किमान ७० हून अधिक लोकांचे बळी गेले आहेत. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीनंतर अनेक रुग्ण दगावले होते.  यानंतरही सरकार आणि प्रशासना मधील मानवी जीवनाच्या बेफिकीरीची गळती थांबायला तयार नाही. नाशिकला २२ रुग्ण दगावले होते. भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीत १० नवजात शिशू, मुंब्रा येथे चार, विरारला १५, भांडूपच्या कोव्हिड रुग्णालयात ११, नागपूरच्या खासगी रुग्णालयात चार,  नगरला ११ जण दगावले,तर आता नांदेड येथे 42 च्यावर रुग्ण दगावले आहेत. ही रुग्णांची मरणयात्रा संपणार कधी? ही संख्या पाहिली की मरण कसे व किती स्वस्त झाले आहे, याची प्रचीती येते. आजारावर उपाय म्हणून जेथे जावे, तेथेच मरण अशा पद्धतीने दबा धरून बसणार असेल, तर सामान्यांनी विश्वास ठेवावा तरी कोणावर? 

   *प्रश्न केवळ मरण स्वस्त होण्याचाही नाही, तर एकाच प्रकारच्या दुर्घटना वारंवार होत* *असताना सरकार, प्रशासन आरोग्य सेवे बाबत करते तरी काय, हा आहे.*

*प्रत्येक दुर्घटनेनंतर काही लोकांना* *निलंबित केले जाते, चौकशी समिती नेमली जाते. समितीचा अहवालही सावकाश  येतो आणि मग काही तरी थातूरमातूर कारवाई करून प्रकरण संपते, हा प्रातिनिधिक अनुभव आहे.* मुळात अश्या घटना घडल्या नंतर त्यातून आजवर सरकारने आणि आरोग्य प्रशासनाने कोणीही काहीही बोध घेतलेला दिसत नाही. रुग्णालयातील *अग्निसुरक्षेबाबत, सिटी स्कॅन,स्वछताग्रह बाबत,खाट उपलब्ध बाबत, शस्त्रक्रियाग्रह बाबत, औषध वाटप बाबत इत्यादी सर्वं प्रश्नाबाबत सरकार व प्रशासन गंभीर नसल्याचे या घटनांमधून वारंवार स्पष्ट झाले आहे.* कोणाला तरी बळीचा बकरा बनवून तापलेले वातावरण थंड केले जाते; पण ठोस उपाययोजना होत नाहीत. अनेक रुग्णालयांचे ‘ऑडिट’ होत नाही ही वस्तुस्थिती असली, तरी ज्यांचे असे ऑडिट होते, त्यात पुढे आलेल्या त्रुटींचे निराकरण होते का, याची खातरजमा करण्याची सक्षम यंत्रणा अस्तित्वात नाही. केवळ कागद रंगविणेचे काम केले जाते. प्रत्यक्षात ऑडिट अहवाल संबंधित यंत्रणा बघतही नसतील, तर दाखविलेल्या त्रुटींचे निवारण करणे दूरच. आरोग्य खात्याची जबाबदारी रुग्णसेवेची आहे , पण अशी निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ही लोकांच्या जीवावरच उठायला लागली, तर सरकारने त्यात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे. चौकशी समित्या नेमून काय होते, ते आपण सर्वजण सध्या पाहात आहोतच.

नाशिक,ठाणे, नगर,भंडारा छत्रपती संभाजी नगर  आणि आता  नांदेड येथील रुग्ण मृत्यूची घटना पाहता रुग्ण मृत्यूचे अनेक कारणे पुढे येत आहेत याचाच अर्थ गेल्या अनेक वर्षभरातील दहा-बारा जिल्ह्यातील रुग्ण मृत्यूच्या घटने नंतर ही सरकार,आणि प्रशासनाणे काहीही शिकले नाही.ही बाब अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. हे सारे पाहिल्यावर ‘असे म्हणावेसे वाटते कि आता मरणही असे छळणार असेल, तर दाद तरी कुणाकडे मागावी? जर मोफत दर्जेदार आरोग्य सेवेबाबत सरकार गंभीर नसेल तर नागरिकांनी रुग्ण हक्काच्या संरक्षण करिता संघटित होऊन या बाबत आवाज उठवून आरोग्य क्रांती करणे गरजेचे आहे.. रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात रुग्ण हितचिंतकांची वज्रमूठ निर्माण करून रुग्ण हक्काच्या संरक्षनार्थ लढा उभारत आहेच पण प्रत्येक नागरिकांने  आरोग्य हक्काच्या बाबत जागरूक होऊन आवाज उठवू लागला तर आरोग्य क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही.....

.........,...............................

अँड निलेश एस करमुडी

संस्थापक अध्यक्ष

रुग्ण हक्क संरक्षण समिती

महाराष्ट्र राज्य

मो.9860682592

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...