आ.संतोष बांगर साहेब यांच्या हस्ते 1 कोटी रुपये निधीतून साकारणाऱ्या घोळवा ते झरा या रस्त्याच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न..



*अशक्य असणारे काम शक्य करून दाखवणारा देव माणूस म्हणजे आमदार बांगर*

    *- गावकऱ्यांनी व्यक्त केला भावना*


*मतदार संघात प्रत्येक गावात सभामंडप, रस्ते, पाणी, वीज अशा सगळ्या गोष्टी देणारा माणूस म्हणजे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब हे आहेत.* घोळवा ते झरा हा रस्ता अनेक शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा प्रश्न होता *अनेक आमदार झाले खासदार झाले परंतु हा रस्ता कोणीही करून दिला नाही* त्यातच काही *कुपमंडूक प्रवृत्तीचे नेते मी फलान्या गावचा रहिवाशी असून ते गाव म्हणजे माझी जहागिरी आहे अशा नशेत वावरत असतात... ते गावकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करतात परंतु त्यांच्या समस्या सोडविण्याचेही भान त्यांना नसते...* अशा परिस्थितीत *घोळवा गावची विविध जाती धर्माची शेतकरी मंडळी आमदार बांगर साहेब यांच्याकडे येते त्यांना मनमोकळेपणाने सांगते की साहेब आम्ही यापूर्वी तुम्हाला मतदान केले नाही परंतु आमच्या गावात फार समस्या आहेत... अडचणी आहेत...त्या दूर करा साहेब...* मोठ्या मनाचे दिलदार माणूस म्हणून ओळखले जाणारे आमदार बांगर यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या... *त्यातील रस्त्याची समस्या गंभीर असल्याने त्यांनी तातडीने सदर रस्त्यासाठी तब्बल एक कोटी रुपये मंजूर करून आणले* आणि *परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला* आज शेकडो शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याची समस्या दूर केली घोळवा ते झरा या एक कोटी रुपये निधीतून साकार होणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाचा भूमिपूजन मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी  *गेल्या 70 वर्षांपासून रस्त्या अभावी प्रचंड कुचंबना सहन करणारे त्या भागातील शेतकरी आनंदित झाले आणि त्यांनी आमदार बांगर म्हणजे खराखुरा शेतकरी मित्र आहे.* *अशक्य ते शक्य करून दाखवणारा देव माणूस आहे* आमची वर्षानुवर्षाची अडचण त्या देव माणसाने दूर केली हाच खरा शेतकरी मित्र अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

*नुसते नावासमोर शेतकरी मित्र लावल्याने व्हत नसते माय...*

*आमदार बांगर सारखं एखादं काम करून पहाय...!!!*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...