येळेगाव येथील कुटुंबीयांना दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने खा.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत

अर्धापूर तालुक्यातील मौजे येळेगाव येथील रहिवासी मयत श्याम संजय कपाटे यांनी दि. ५  ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. 
या घटनेची माहिती येळेगाव येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना दिली असता दि ९ ऑगस्ट ३०२४रोजी दादाराव पाटील ढगे यांच्यावतीने नांदेड जिल्ह्याचे खा.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते कपाटे पीडित कुटुंबियांना ५१ हजार रुपयाची आर्थिक मदत केली.
यावेळी उपस्थित असलेले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम,
जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर,,पप्पू पाटील कोंडेकर, काँगेस जिल्हा प्रवक्ता सुभाष लोणे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष पाटील कपाटे, माजी उपसभापती अशोक पाटील कपाटे, शेरू पठाण माजी सरपंच बाबुराव कपाटे, सदाशिव कपाटे कैलास कपाटे मदन कपाटे, इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...