न्याहाळोद येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी दणक्यात साजरा _प्रा.मोतीलाल सोनवणे


न्याहाळोद येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी दणक्यात साजरा _प्रा.मोतीलाल सोनवणे

    *संत शिरोमणी नामदेव यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव नामदेव दामा रेळेकर असे होते. त्यांच्या आईचे नाव गोणाई. जातीने शिंपी होते.त्यांच्या जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले ते विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. विसोबा खेचर हे त्यांचे गुरु होते. संत जनाबाई व संत चोखामेळा हे नामदेवांना गुरु मानत. ते वारकरी संप्रदायातील संत कवी होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार पंजाब पर्यंत केला. त्यांच्या अभंग गाथेत सुमारे २५०० पेक्षा अधिक अभंग आहेत. नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी या उक्तीनुसार त्यांनी आजीवन भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. ३जुलै १३५० रोजी त्यांनी समाधी घेतली.*

    *शिंपी समाजाच्या वतीने न्याहाळोद ता. जि.धुळे येथे शनिवार दिनांक १५/७/२०२३ रोजी श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी आनंदात साजरा करण्यात आली. न्याहाळोद गावात शिंपी समाजाचे फक्त १० ते १५ कुटुंब राहतात. असा स्तुत्य उपक्रम सतत १७ वर्षापासून नियमित करतात. सकाळी ९.०० वाजता प्रतिमा पूजन ९.३०ते१२ वाजेपर्यंत वारकरी भजनी मंडळाचा कार्यक्रम१२.०० वाजता आरती होते. नंतर महाप्रसाद वाटप कार्यक्रम होतो. आयोजकांनी नियोजनबद्ध कार्यक्रम केला. त्यामुळे संपूर्ण न्याहाळोद गावात आनंदाचे वातावरण तयार झाले होते.*

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...