स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे.यांचे बलिदान दिवस साजरा..,,सम्राट अशोक सेना,,आकाश शिरसाट

 


११ मार्च १६८९ ला. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे.यांचे बलिदान दिवस आहे,,सम्राट अशोक सेना,,आकाश शिरसाट यांच्याकडून सर्वांना विनंती आहे की,छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल मी इतिहास सांगण्याचे प्रयत्न करणार, सर्वांनी मन लावून वाचावे..!!!.. छत्रपती संभाजीराजांनी,त्यांच्या सरदाराची महत्वाची बैठक, कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती १ फेब्रुवारी १६८९.रोजी बैठक संपून,संभाजी राजे रायगडकडे रवाना होत असतानाच औरंगजेबचा,सरदार  मुकर्रखान यांनी,संभाजीराजे यांच्या,३०० ते ४०० मावळ्यांच्या तुकडीवर आपले ३००० सैन्य घेऊन. संगमेश्वराजवळ चालून आला. मावळ्यांचे,( धनाजीबाबा घोरपडे,संताजी घोरपडे चे वडील,धनाजी जाधव,आणि कवी कलश ),हे सर्व मावळ्यांचे आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मावळ्यांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्नांची शर्थ करूनही मावळ्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नव्हते.संगमेश्वर कसबा पेठ येथे सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये.संभाजी राजे मुक्काम होते,हे त्यांची माहिती शत्रूला कोणी दिली ,कोण फितूर झाला,कोणा मुळे संभाजी राजे पकडले गेले,, ९ वर्षाचे असताना संभाजीराजांनी,दिल्ली येथून शत्रूच्या तावडीतून,आपली स्वतःची सुटका करून घेतली, परंतु,आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या राज्यांमध्ये,कसे काय पकडले गेले ? आपलेच गद्दार होते म्हणून तर,सिंहाचा. छाव्याला शत्रूच्या पिंजऱ्यात कैद होण्याचे प्रसंग आले,, संभाजीराजे आणि कवी कलश यांना.जिवंत पकडून यांना,संगमेश्वर नवडी बंदर.या मार्गाने पडेगाव चा भुईकोट, बहादूरगड,धर्मवीरगड, अहमदनगर.ला आणण्यात आले,संभाजीराजे आपल्या किल्ल खजिन मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगितले गेले,आमच्यामध्ये कोण फितूर आहे,याची माहिती सांग,शत्रूंनी असे विचारले,परंतु झुकेल तो छत्रपती संभाजीराजे कसाला,मोडेन पण वाकणार नाही,चा नारा देत संभाजी राजे.मुघलांचे अत्याचार.सोसत राहिले,धर्मवीरगड इथेच, छत्रपती संभाजी राजे,आणि कवी कलश,या दोघांचे.डोळे काढण्यात आले.जिभ छाटण्यात आली,त्यांची नखे काढून कातडी.सोलून छळ करण्यात आली.४० दिवसापर्यंत असह्य.यतना सहन.करूनही संभाजीराजांनी,स्वराज्यनिष्ठा, आणि धर्मनिष्ठा सोडली नाही,, औरंगजेबाने आपले मुक्काम तुळजापूर येथे हलवला. संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. एकनिष्ठा न सोडणाऱ्या महाराजांच्या. मुखातून आक्रोशची.लकेरही उमटली नाही.एवटे करूनही शंभुराजे डगमगले नाहोत, स्वराज्याचा धनी.अनंतात विलीन झाला.एवढे अत्याचार करूनही.सुद्धा या भारताचा राजा.झुकला नाही. तुळजापूर, वढू बुद्रुक येथे,संभाजीराजे यांचे पवित्र देहाचे तुकडे, नदीमध्ये (इंद्रायणी, भामा, आणि भीमा,या नदीमध्ये फेकण्यात आले,,तिथे नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या, ( जनाबाई )येणे पाहिले,आणि गावांमध्ये जाऊन सर्वांना सांगितले की,आपल्या छत्रपती संभाजी राजाचे देहाचे तुकडे. त्या औरंग्यान.नदीमध्ये फेकून दिले अशी सर्व लोक गावकरी यांना माहिती दिली,सर्व घाबरत होते थरथर कापत होते,परंतु जनाबाईच्या कडून काही राहुल्या गेलं नाही,सर्व गावांमध्ये फिरली,परंतु कोणीही समोर यायला तयार नव्हते,त्यावेळेस (गणपत गोविंद महार व सिद्धीनाक महार ) बोलले आपण आपल्या राजाला असं कसं सोडायचं,. औरंगजेबच्या. दहशतीने कोणीच राजाला,अग्निसंस्कार करण्यासही जमीन देत नव्हते. घरात गुपचूप बसून ते थरथर कापत होते,शेवटी ( गणपत महार यांनी, जनाबाई ) व सर्व गावकरी. यांनी.आपल्या राज्याचे देहाचे तुकडे शिवले. आणि महारवाड्यातच, छत्रपती संभाजी राजांना अग्नी दिली,आणि त्यांची समाधीही बनवली,आजहि वड बुद्रुक तुळजापूर इथे छत्रपती संभाजी राजांची समाधी हे महार वाड्यात आहे,,आज ११ मार्च रोजी त्यांचे ३२ व्या वर्षी बलिदान झाले आज तो दिवस आहे,या शूर वीर महाबलवान धर्मरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी राजे,यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन करतो, व मानाचा मुजरा करतो...💐💐🙏💐💐... सम्राट अशोक सेना,,आकाश दादा शिरसाट,,भिम नगर जुने शहर अकोला,,जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे, जय भीम,छत्रपती संभाजी राजांचा विजय असो

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...