भोकर तालुक्यात म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी काढले आदेश




भोशी,किनी,पाळज व रिठ्ठा सह 56 गावांचा समावेश



भोकर (तालुका प्रतिनिधी) तालुक्यात म. ग्रा. रो. ह. यो. अंतर्गत ग्रामीण भागाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेली कामे निकृष्ट दर्जाची करून घाई गडबडीत उरकण्यात आली, कालावधी संपल्यानंतर ही कामे करण्यात आली, मस्टरवर वेगळे मजूर आणि प्रत्यक्षात दुसरेच मजूर अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने व वृत्तपत्रांमधून बातम्या प्रकाशित झाल्याने भोकर पं.स.चे गट विकास अधिकारी अमित राठोड यांनी भोसी, किनी, पाळज व रीठा ग्रामपंचायती सह 56 गावातील कामांची चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत.


     भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात विकासाची कामे चांगल्या प्रकारची व्हावे, गावाची सुंदरता दिसावी या हेतूने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकरावजी चव्हाण यांनी म. ग्रा. रो. ह. यो. अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांमध्ये पेवर ब्लॉक व शिशी रस्त्याची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून दिला. भो सी, रिठा, पाळज व किनी या चार ग्रामपंचायतींना प्रत्येकी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. व इतर 57 ग्रामपंचायती अंतर्गत 4 कोटी 7 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. 31 मार्च ही कामे करण्यासाठी शेवटची तारीख असल्यानेकामे उरकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घाई-गडबड झाली त्यामुळे कामांचा दर्जा राहू शकला नाही. 15 एप्रिल ही तारीख वाढून आल्यानंतर देखील काही ठिकाणी कामे 21 एप्रिल च्या दरम्यान चालूच होते, सदर होणारी कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची हलक्या प्रतीचे साहित्य वापरून बोगस रित्या करण्यात येत आहेत मस्टरवर वेगळेच मजूर दाखवून कामावर बाहेरील मजूर कामावर होते, नियमा नुसार कामे करण्यात आलेली नाहीत अशी तक्रार भोशी येथील, संतोष आकेमवाड , कपिल कल्याणकर, शहाजी कल्याणकर यांनी केली होती. 4 एप्रिल 11 एप्रिल 13 एप्रिल 19 एप्रिल अशा अनेक वेळा तक्रारी करून अखेर उपोषणाचा इशारा देण्यात आला होता व वृत्तपत्रातून बातम्यांचा भडिमार करण्यात आला होता त्यामुळे झोपेतून खडबडून प्रशासन जागे झाले आणि दि. 26 एप्रिल रोजी भोसी, रिठा, पाळज, किनी सह तालुक्यातील 56 गावांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या पेवर ब्लॉक व शि.शि. रस्त्याची चौकशी करण्याचे आदेश पं.स.चे गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी काढले आहेत. जी.प.बांधकाम विभाग उपअभियंता भोकर, तांत्रिक अधिकारी पंचायत समिती भोकर यांना तसे आदेश काढून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


*गटविकास अधिकारी म्हणतात तक्रार आली तरच चौकशी करतो *

*****************************************

भोकर तालुक्यात म ग्रा रो ह यो ची  पेवर ब्लॉक व शिशी रस्त्याची कामे करण्यासाठी 7 कोटी 27 लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना मिळाला. काही मोठ्या आणि विशेष ग्रामपंचायतींना मात्र प्रत्येकी 80 लाख रुपये मिळाले सदर कामे घाईगडबडीत करण्यात आल्याची व निकृष्ट दर्जाचे हलक्या प्रतीचे मटेरियल वापरून करण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, काही छोट्या ग्रामपंचायतींनी वेळेत व चांगल्या दर्जाची कामेही केली.ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्या तिथे वेळेवर चौकशी करण्यात आली नाही ग्रामस्थांना उपोषणाचा इशाराही द्यावा लागला

याबाबत भोकर पं.स.चे गटविकास अधिकारी अमित राठोड यांच्याशी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले तक्रार आली तरच चौकशी करतो.ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायती अंतर्गत मग्रारोहयो ची कामे चालू आहेत त्या प्रत्येक ठिकाणी गटविकास अधिकारी यांनी कामाची पाहणी करणे गरजेचे आहे तक्रार असो वा नसो काम कशा पद्धतीने चालले कामाचा दर्जा, वापरण्यात येणारे मटेरियल, नियमानुसार काम होते का, ह्या सर्व बाबी गटविकास अधिकाऱ्यांनी तपासणे गरजेचे आहे,वरील वाक्य मी बोललोच नाही असे म्हणत अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी भोकर तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत.ज्या अधिकाऱ्यांना हे आदेश काढलेले आहेत त्यांनी योग्य प्रकारे कसून चौकशी व कामाचा दर्जा, करण्यात आलेले काम नियमानुसार करण्यात आले आहे काय? हे पाहणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...