ग्रामीण भागातही कुस्तीला मिळणार नवसंजीवनी..संस्थापक अध्यक्ष पै मारोती भाऊ जाधव यांनी खान्देश दौरामधे केले मार्गदर्शन


आज दिनांक ५/२/२०२२ रोजी पैलवान गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा पै मारोती भाऊ जाधव,कोल्हापूर व उपाध्यक्ष पै किशोर भाऊ नखाते, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सौ कविता ताई कोळी,धुळे, पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा यांनी आयोजित केली होती... केशरानंद गार्डन धुळे येथे पदाधिकारी मिटींग झाल्यानंतर बालगोपाल व्यायाम शाळा जुणे धुळे येथे पैलवान गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व उपाध्यक्ष किशोर भाऊ नखाते यांनी ,सौ कविता कोळी, श्रीमती वैशाली चव्हाण, अँड शोभा खैरणार, यांनी भेट दिली,यावेळी उपस्थित मान्यवर पै गोरख पाटील, पै आकाश परदेशी, पै प्रभाकर चौधरी, पैलवान राम कानडे, पै जगदीश सरोदे यांनी बालगोपाल व्यायम शाळा दाखवून कुस्ती विषयी अनमोल मार्गदर्शन व चर्चा केली, पैलवान गृप महाराष्ट्र राज्य कुठल्याही कुस्तीप्रेमीच्या नेहमीच पाठिशी असुन गरजु पैलवानांना सहकार्य करण्याचे व बालगोपाल व्यायाम शाळेस गृप कडुन लवकरच तालमीस आवश्यक भेटवस्तू रूपाने देण्याचे आश्वासन पै मारोती भाऊ जाधव यांनी दिले, महाराष्ट्र उपाध्यक्ष पै किशोर भाऊ नखाते यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की पैलवानांनी सरावा पैक्षा सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे,कुस्ती हा  खेळ भारतीय  खेळाडूंचा पूरातन खेळ आहे, तंत्रज्ञानाचा युगात तरुण मोबाईल च्या माध्यमातून भरकटला आहे,

या तरूणांना पुन्हा मातीमध्ये उतरवण्यासाठी सर्वानी प्रयत्न करायचे आहे संघटन वाढवून गरीब व होतकरू मुलांना प्रोत्साहन द्या,त्यांना पैशाची नड सामाजिक दानातुन पूर्ण करा, त्यांना पूर्ण खुराक कसा मिळेल या कडे लक्ष द्यावे, पुणे कोल्हापूर कडे खान्देश कडुन आलेल्या मुलांना सहकार्य केले जाईल,असे आव्हान केले.. .सौ कविता ताई कोळी यांनी सागितले की पै मारोती भाऊच्या  आश्वासनाचे  लवकरच पूर्तता केली जाणार ..व लवकरच महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंना पैलवान गृप कडुन सन्मानित करण्यात येऊन धुळे मधुन उत्कृष्ट एक महीला ,एक पुरुष कुस्तीगीर घेणार आहोत, यावेळी बालगोपाल व्यायाम शाळेचे उपस्थित मान्यवर पै गोरख पाटील, पै आकाश परदेशी, पै जगदीश सरोदे, पै रविद्र माळी,पै राम कानडे, पै दादा कोळी, पै एन के पाटील, पै सनी वाडेकर, पै विशाल बैसाणे, पै भुषण बोरसे,पै पवन चौधरी, पै श्रृषीकेश सोनार, पै राकेश डेक, पै निखिल माळी,पै डिगबंर माळी आदि उपस्थित होते, तदनंतर उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट अशी व्यायाम शाळा हरहर महादेव व्यायाम शाळा धुळे येथे पै सुहास अंपळकर यांनी पैलवान गृप संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत करुन सर्वांना सन्मानित केले, अतिशय उत्कृष्ट अशी धुळे मधील दहा हजार स्क्वेअर फुट जागेत बांधलेली व्यायाम शाळेचे

व्यवस्थापन,तालीम,बघुन सर्वांनी आनंद व्यक्त केला व शुभेच्छा दिल्या, तदनंतर पैलवान सागर भाऊ कांबळे यांच्या कार्यालयात पैलवान गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला  , पै भरत माळी,पै अभिजित राजपूत,  रोहीत भाऊ यादव, गजु पैलवान, सचिन पैलवान , पै मोहीत, पैलवान विक्की पैलवान,दर्षन निकम, पै रोहीत जगताप,पै आकाश माथुरे,पै रामभाऊ गवळी,आदि पैलवान उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...