उमरीत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने गुरूवारी सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन. ..


 उमरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ कपिल जाधव यांचे आहावान. 

उमरी ( प्रतिनिधी)

नको दुरावा द्या आधार बरे होतील मानसिक आजार

चला बोलूया नैराश्य टाळूया या अनुशंगाने

श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रूग्णालय नांदेड च्या वतीने मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रम याच्या सौजन्याने   03 फेबुरवारी  ग्रामीण रुग्णालय उमरी येथे आयोजन करण्यात आले.ताण तणाव निवारण व मानसिक आरोग्य शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जनतेने या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे उमरी ग्याग्रामी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ कपिल जाधव यांनी दिले.या शिबिरात खालील मानसिक समस्या व आजारावर उपचार केले जातीलचिंता, नैराश्य, झोप न येणे, व्यसनाधीनता, जुनाट डोकेदुखी, झटके येणे, करणी,भानामती, स्किझोफ्रेनिया, काल्पनिक आवाज ऐकू येणे, अकारण बडबड, मतिमंदत्व, विस्मरण,लहान मुलांमधील किंवा शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले मानसिक ताण- तणाव  तसेच अनेक मानसिक आजार व समस्येवर मानसोपचार तज्ञांमार्फत मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जातील.तरी संबंधित समस्या व आजार असलेल्या आपल्या  जवळील नातेवाईक, मित्र तसेच गावातील सर्व लोकांना शिबिराबाबत माहिती देऊन सहकार्य करावे.असे आहावान उमरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.कपिल जाधव यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...