205 उपोषणानंतर सुशिलकुमार पावरा यांचे उपोषण तात्पुरते स्थगित..

 

दापोली    : दोषी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारक विजय दाजी बाईत तत्कालीन  व बोगस डिग्री धारक , दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना आणि 31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 205 वे उपोषण पांगारवाडी दापोली येथे पूर्ण केले. दिनांक 31 जानेवारी पर्यंत उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी  तहसीलदार दापोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी आज सायंकाळी 5 नंतर आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.  निवेदनाची पोहच घेऊनच आपले उपोषण सुरूच ठेवले होते. गटविकास अधिकारी दापोली आर.एम.दिघे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांना पावरा यांच्या उपोषणाबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला आहे. 

            निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने काही अधिकारी,  समाजकंटकांनी व राजकीय पदाधिकारी  यांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे. सदर षडयंत्रात प्रामुख्याने विजय दाजी बाईत हे सहभागी आहेत .

               एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर दोषी, भ्रष्टाचारी व बोगस अधिका-यांना पाठीशी घालणे,शिक्षक कर्मचा-यांचा छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीभेद करणे,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिका-यांचे आदेश दडपून ठेवणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे,दिशाभूल करणारे पत्रव्यवहार करणे,माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-या दोषी अधिका-यांना वाचवणे,बोगस प्रमाणपत्र धारकांना अभय देणे,  आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणे  इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप करण्यात आले आहेत.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

                 आपले उपोषण हे  तात्पुरते स्थगित केले आहे. परंतु     जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी बोगस विस्तार अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा  मी सुरूच ठेवणार आहे.  अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...