शासकीय अधिकाऱ्यांनी नियमानुसार 7 दिवसाच्या आत मुख्यालयी निवासस्थानी राहावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार ___ जनशक्ती संघटना.



कन्नड तालुक्यातील बहुसंख्य शासकीय कर्मचारी हे मुख्यालयी आवास करण्याच्या शासन निर्णयाचा भंग करून औरंगाबाद व अन्य मोठ्या शहरातून अपडाऊन करून कर्तव्य पार पाडण्यात दिखावा करत असून अपडाऊन मुळे या कर्मचाऱ्यांच्या कामकाज तसेच क्षमतेवर विपरीत परिणाम होत असून याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या कामकाजात दिरंगाई होत आहे. अनेक महसूली न्यायालयीन प्रकरणे देखील केवळ संबंधित शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे अपडाऊन मुळे व वेळे अभावी पुढची तारीख देऊन कारवाई पुढे ढकलली जात आहे यामुळे  सर्वसामान्य जनतेचे आर्थिक व मानसिक शोषण होत आहे. ग्रामसेवक, तलाठी व शिक्षक यांच्या सारख्या जनसंपरकीत कर्मचारी देखील मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झालेला असून शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला तसेच विद्यार्थ्यांना या कर्मचाऱ्यांच्या अपडाऊन मूळे त्यांचे शासकीय कामे व शिक्षण या पासून वंचित राहत आहे लहान समान कामे देखील २ ते ३ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. तालुक्यातील विद्यार्थी शिक्षना पासून वंचित राहत असून स्पर्धेत मागे पडत आहे. तसेच कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी देखील कर्तव्यावर हजर नसतात अपडाऊन मुळे शेतकरी हे शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. 

        अपडाऊन मूळे जवळजवळ सर्वच शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार, लाचखोरी व अन्य गैरप्रकारात वाढ होत आहे. तलाठी, ग्रामसेवक यांच्या सारखे शासकीय कर्मचारी हे बेकायदेशीर रित्या झिरो कर्मचारी नेमुन त्यांच्या हातात शासकीय दप्तर सोपवतात त्यामुळे शासकीय पातळीवर जनतेच्या प्रशनल कागदावर सुरक्षिततेचा देखील खूप मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वसामान्य जनता ही त्यांच्या कामकाजासाठी या अधिकाऱ्यांना मोबाईल वर कॉल करतात तर हे अधिकारी त्यांचा कॉल ही घेत नाही तसेच मोबाईल बंद करून ठेवतात व कॉल घेतलाच तर सांगतात की मी कन्नड येथील वरिष्ठ शासकीय कार्यालयात आहे मात्र ते तिथे ही उपस्थित नसतात. व शासनाची व सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करतात. व कामावर गैरहजर असूनही शासकीय वेतन घेतात. सदरील कर्मचार्यांकडून शासन नियम, कायदा, अटी, शर्ती यांचे पालन करून घेण्याची जवाबदारी प्रभारी अधिकारी दंडाधिकारी यांनी यांनी हतनूर टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून तपासणी करावी व अपडाऊन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही करावी अन्यथा जनशक्ती संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय कन्नड समोर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. 

   यावेळी मा. अनिल शेळके पाटील(जनशक्ती संघटना जिल्हा कार्यध्यक्ष), मा. युवराज भाऊ बोरसे पाटील(युवक जिल्हा कार्याध्यक्ष), मा. संतोष साळुंखे पाटील(जनशक्ती तालुका अध्यक्ष), एजाज शेख( उपजिल्हा अध्यक्ष), सुदर्शन सुसलादे(युवक उपतालुका प्रमुख) व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...