हाडोळीच्या ग्रामस्थांनी जीव ओतून केलेले काम व्यर्थ जाणार नाही_सभापती जगदीश पा.भोसीकर

 


भोकर (तालुका प्रतिनिधी) गावातील मतभेद गटतट विसरून सर्व गावकऱ्यांनी मिळून काम केले म्हणून आज हाडोळी गाव स्वच्छ आणि सुंदर बनले आहे गावात झालेली सर्व कामे पाहून अत्यंत आनंद झाला मन रमून गेले, सर्वांनी एकोपा टिकून ठेवून काम केले आहे त्यामुळे तुमचे श्रम व्यर्थ जाणार नाहीत विभागीय पातळी पर्यंत गाव गेले पाहिजे असा विश्वास भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर यांनी हाडोळी येथे बोलताना व्यक्त केला.

      हाडोळी गावाने स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत भाग घेतला असून गावातील रस्ते स्वच्छ केले, वृक्षारोपण झाले,प्रत्येक घराला एकच रंग, प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी, 100% कर भरणाऱ्यांना दळण मोफत, शाळा, अंगणवाडी, उपकेंद्राची स्वच्छता, बंदिस्त नाल्या, हात धुण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वॉश बेसिन, प्रत्येक गल्लीला गावात कमानी, अशा अनेक सुविधा गावात करून गाव विकासाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.असे सुंदर स्वच्छ गाव पाहण्यासाठी दि. 20 जानेवारी रोजी भोकर तालुक्यातील ३०ग्रामपंचायतीचे सरपंच गाव भेट पाहणीसाठी आले होते.अतिशय सुंदर स्वच्छ आणि रमणीय गाव पाहून साऱ्यांनी कौतुक केले ग्रामपंचायत कार्यालय हाडोळी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात सरपंच माधवराव अमृतवाड यांनी गावातील सर्व लोकांनी सहकार्य केल्यामुळे गटतट सोडून सर्व बालक युवक महिला ज्येष्ठ नागरिक या सर्वांनीच मनातून तळमळ केल्यामुळे हे यश गावाला प्राप्त झाले आहे असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.यावेळी प्रमुख अतिथी भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोशीकर पुढे बोलताना म्हणाले राजकीय मतभेद विसरून गावकरी गावाच्या विकासाच्या कामाला लागले आहेत हे पाहून खूप आनंद झाला गावाच्या विकासासाठी जीजी अजून मदत लागेल ती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्फत मिळवून देण्याचे माझे प्रयत्न राहतील इतर ग्रामपंचायतीला विकासाचा निधी मिळवून देण्यासाठी माझे सर्वस्वी प्रयत्न राहतील, दुजाभाव कुठे केल्या जाणार नाही काही अडचणी असतील तर सरळ माझ्याशी भेटून सर्वांनी सांगावे समस्या ना. अशोकराव चव्हाण साहेबा पर्यंत पोहोचविला जाईल मी आपल्या भागा साठी "पोस्टमन" म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे कोणीही कुठलाही संकोच न करता माझ्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी सांगाव्यात असे सांगून हाडोळी गावाच्या विकासासाठी 51 हजार रुपयाचा निधी त्यांनी वयक्तिक दिला. माजी सभापती शिवाजी देवकुळे,पत्रकार बी. आर. पांचाळ, ॲड. शेखरकुंटे, सरपंच रंगराव पाटील, अंबादास आटपलवाड, सुदाम आडे, संगपवाड गुरुजी, संदीप पा.गौड,आदींनी हाडोळी गावाच्या विकासा बाबत विचार मांडून इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे मत मांडले. यावेळी उत्तम पाटील, विजय पाटील मोरे, गजानन ढगे, धनराज जाधव, मल्लेश दंतुल वार, यांचे सह दिगंबर लालवांडे, मारुती मुंडकर, गंगाधर पा. हाडोळे, बाबुराव तोटावड, रामराव मुंनगे, संजय पा.जाधव, संभाजी किनेवाढ, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...