जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियोजन समिती सभागृहात सर्व बुलढाणा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विविध संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली...


काल बुलढाणा जिल्ह्यातील कोळी महादेव  जमातीला कोळी महादेव अनुसूचित जमातीचे जमाती प्रमाणपत्र मिळताना संबंधित उपविभागीय अधिकारी 1950 च्या पुर्विचा जातीचा नोंद असलेल्या महसुली पुराव्यामुळे प्रमाणपत्र देतांना अडवणूक करतात या अडचणी सोडविण्या करता काल बुलढाणा येथे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियोजन समिती  सभागृहात सर्व बुलढाणा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विविध संघटनेच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला माननीय जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेब तसेच आदिवासी नेते डॉ दशरथ भांडे साहेब उपस्थित होते या बैठकीमध्ये माननीय डॉ दशरथ भांडे साहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या समोरच उपविभागिय अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर यांचा खरपूस समाचार घेतला आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सर्व पुराव्यासह खोडून काढले उपविभागीय अधिकारी  यांनी तपासणी समितीचे काम न करता आपल्याला  शासनाने जात प्रमाण पञ देन्याचे अधिकार दिले तपासन्याचे नाही म्हऩुन आपण फक्त जात प्रमाण पञ दण्याचे काम करावे  यांनी काढलेल्या अडचणी संदर्भात माननीय डॉक्टर दशरथ भांडे साहेब यांनी ज्या पद्धतीने उपस्थित उपविभागिय अधिकारी यांचा ज्या भाषेत समाचार घेतला ते संपूर्ण सभागृहातील समाज बांधवांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे हे सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष बघितले
यावेळी प्रशांत आढे , गजानन घाईट, एकनाथ जुवार , बाबा जुवार  रघुनाथ खडसे यांनी आपली मागण्या पुराव्यासह मांडल्या शेवटी मा जिल्हा अधिकारी यांनी उपस्थित उपविभागिय अधिकारी यांना सांगितले की या जमातीला प्रवाहात आणणे आवश्यक आहे काही पुराव्याची नाहक मागणी करुन अडवणुक करु नये आपल्या सदविवेकबुद्धीने विचार करुन प्रमाण पञ द्यावी  यावेळी आदीवासी कोळी महासंघ जिल्हा अध्यक्ष दशरथ लोणकर ,कर्मचारी जिल्हा अध्यक्ष सुरेश इंगळे ,अकोला जिल्हा अध्यक्ष प्रशांत तराळे ,बुलढाणा तालुका अध्यक्ष दादाराव जाधव, सुरेश ननावरे व बुलढाणा जिल्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...