दापोली : दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्र धारी व षडयंत्र कारी विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक , दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा,31 दोषारोपीत एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे 200 वे उपोषण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या दालनासमोर होणार आहे. उपोषणाचे निवेदन आण्णासाहेब बळवंतराव गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती दापोली यांच्यामार्फत इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना देण्यात आले आहे. शिक्षक पावरा यांचे 195 वे उपोषण दापोली येथे सुरू असून 25 जानेवारीला 199 वे उपोषण पूर्ण होईल.उपोषण क्रमांकानूसार 26 जानेवारीला त्यांचे 200 वे उपोषण होणार आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. विजय दाजी बाईत यांच्या विरोधातल्या 04/07/2018 रोजीच्या चौकशीच्या अनुषंगाने महेश जोशी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सह माजी मंत्री व राजकीय पदाधिकारी, समाजकंटक,पालकामार्फत विजय दाजी बाईत यांनी माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवले.सदर बनावट पणा चौकशी अहवालात व वृत्तपत्रांतील बातम्यांद्वारे समोर आला आहे. सदर षडयंत्रात प्रामुख्याने विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली, महेश जोशी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी,एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी,नंदलाल शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांच्या सह काही समाजकंटकांचा हात आहे.
एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वर दोषी, भ्रष्टाचारी व बोगस अधिका-यांना पाठीशी घालणे,शिक्षक कर्मचा-यांचा छळ करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीभेद करणे,विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी वरिष्ठ अधिका-यांचे आदेश दडपून ठेवणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे मूळ कागदपत्रे लपवून ठेवणे,दिशाभूल करणारे पत्रव्यवहार करणे,माहिती अधिकार अर्ज कोर्ट टिकीटसह फाडणा-या दोषी अधिका-यांना वाचवणे,बोगस प्रमाणपत्र धारकांना अभय देणे, आरोपीलाच चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करणे इत्यादी 31 प्रकारचे गंभीर दोषारोप आहेत. सदर दोषी अधिका-यांना राजकीय पदाधिकारी पाठीशी घालत असल्यामुळे अद्याप कारवाई होत नाही.
नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. अशा बोगस व वादग्रस्त दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करावे, माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करावे,अशा एकूण 28 मागण्यांसाठी मी दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या दालनासमोर माझे 200 वे उपोषण करीत आहे.तरी मला परवानगी मिळावी.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.