निवडणुका कोणत्या ही असो लोकसभा असो की विधानसभा जिल्हा परिषद असो की पंचायत समितीच्या निवडणुका असो अथवा ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक असो या सदरच्या निवडूनुकी मध्ये देशी विदेशी दारूचा महापूर तर बकऱ्या कोंबड्याचा मोठ्या प्रमाणात बळी जातो असा प्रकार केवळ मत मिळण्यासाठी दर पाच वर्षाला केला जात आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक सध्याच्या परिस्थिती मध्ये चालू झाली असल्याने सुज्ञान मतदारांनी एका देशीच्या पावशेरीत मतदान विक्री करण्या पेक्षा लोकसभा पोट निवडणूक व विधानसभेच्या रिंगणात असलेल्या अचूक उमेदवाराला मत दिले तर लोकशाहीच्या हिताचे ठरणार आहे
कोणत्या ही निवडणूक असो राजकीय पुढाऱ्यांना मत वळविण्यासाठी एकच पर्याय असतो देशी दारूचा महापूर बकऱ्या कोंबड्याचे मटण असा प्रकार चालून मत वळविण्याचा प्रयत्न केला आहे
लोकशाही मार्गाने मतदान केल्यास सुज्ञान मतदार राजा बरोबर अचूक उमेदवारला निवडून दिल्या शिवाय स्वस्त बसत नाही परंतु राजकीय पुढार्याकडून तस होत नाही निवडणुकीच्या काळात दारूचा महापूर कोंबड्या बकऱ्याचे मटण हे कायमचे बंद झाले पाहिजे हे लोकशाहीच्या हिताचे आहे
Tags:
भोकर