फटाके बार न करता शहीद जवान व महामानव बिरसा मुंडा यांना अभिवादन करून महानंदा नागोराव मोटेकर यांनी केली दिवाळी साजरी.
प्रदूषण मुक्त, विचाराची दिवाळी
भोकर नव्हे तर संपूर्ण भारतात दिवाळी सण साजरा केला जातो, परंतु भोकर येथील भोकर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार म्हणून महानंदा नागोराव मोटेकर यांनी भोकर भोकर येथील शहीद प्रफुल्लकुमार गोवंदे, शहिद नरसिंग जिलेवाड, पांडुरना येथील शहीद जवान स्मारक ठिकाणी अभिवादन करून दिवाळी सणाचे अनोखे अभिवादन केले आहे.
भोकर येथील महामानव बिरसा मुंडा यांना पुष्पहार टाकून अभिवादन केले आहे. सोबतच भोकर तालुक्यातील शहिद जवान प्रफुल्लकुमार गोवंदे, नरसिंग जिलेवाड व पांडुरना येथील शहीद जवान यांना पुष्पहार टाकून महानंदा नागोराव मोटेकर यांनी अभिवादन करून अनोखी व चर्चा होण्यासारखी दिवाळी सण साजरा केला आहे.