खासगी शाळेतील शैक्षणिक शुल्क वाढीचा विरोध. दापोलीच्या गटशिक्षणाधिका-यांना बिरसा फायटर्सचे निवेदन.


दापोली: खासगी शाळेतील प्रवेश शुल्कात 25 ते 30 टक्क्यांनी झालेली वाढ रद्द करावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी दापोलीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन बी.टी.राठोड शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांना सुशिलकुमार पावरा यांनी दिले आहे. निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. 

               निवेदनात म्हटले आहे की,  कोरोनानंतर आता नियमितपणे शाळा सुरू झाल्या आहेत. काही खासगी शाळांनी पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश शुल्कात तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ केली आहे. कोरोना कालावधीत पालकांच्या आंदोलनांमुळे व मागणीमुळे मागील शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्कात 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.कोरोना कालावधीत अनेक पालकांचे व्यवसाय बंद पडले,नोक-या गेल्या,काम बंद पडल्यामुळे आर्थिक संकट आले होते.शासकीय कर्मचारी वगळता अनेक पालक अजूनही आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. त्यातच महागाईही वाढली आहे व शैक्षणिक शुल्कात झालेली वाढ यामुळे पालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सीबीएसई शाळांच्या शुल्क वाढीत राज्य सरकारने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशी सूचना केन्द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. त्यानुसार केवळ कागदोपत्री सरकारने नियंत्रण आणले.मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.  

                 


महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था ( शुल्क विनियमन) अधिनियम 2011 हा कायदा पारित करून शुल्क निर्धारण व शुल्क वाढ याबाबत नियमावली तयार केली आहे.तरी खासगी शाळेत मनमानी कारभार करून मर्जीप्रमाणे शैक्षणिक शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. वाढवलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे,त्यामुळे पुन्हा या शुल्क वाढीच्या विरोधात पालकांचे तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून खासगी शाळांमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी झालेली वाढ त्वरीत रद्द करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...