मंजूर वनपट्टाधारकांना सातबारा व गाव-वाड्यांना महसुली दर्जा मिळावा..


बिरसा फायटर्सची मागणी; जिल्हाधिका-यांना निवेदन* 



दापोली : जिल्ह्यातील मंजूर वनदावेदारांना ७/१२ उतारा मिळावा,प्रलंबित वनदावे निकाली काढा व अद्यापही महसुली न झालेल्या गावांना महसूली दर्जा मिळावा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन.पाटील व महाराष्ट्राचे  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. 

               निवेदनात म्हटले आहे की,  गेल्या ७०-७५ वर्षापासून आदिवासी आपली वडिलोपार्जित  वनजमीन उदरनिर्वाहासाठी कसत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकरी सतत मागणी करत आहे.अनेक मंजूर वनपट्टा धारक शेतकऱ्यांना गेल्या सहा-सात वर्षांपासून ताबा पावत्या मिळाल्या आहेत.परंतु,७/१२ उतारा अद्यापही न मिळाल्यामुळे शासनाच्या योजना व बँकेच्या पीक कर्जापासून वंचित राहावे लागत आहे.अद्यापही हजारो वनदावे प्रलंबित आहेत.ती वनदावे लवकरात लवकर निकाली काढावेत.

        स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर ही जिल्ह्यातील शेकडो गावांना महसुलीचा दर्जा मिळालेला नाही.रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, मंडणगड, खेड,चिपळूण व उर्वरित इतर तालुक्यातील अनेक गावे व वाड्या आहेत.ज्यांना  आजही महसुली दर्जाची प्रतीक्षा आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करीत असतांना आदिवासी आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे.आजही अनेक आदिवासी पाड्यात पाण्याची, विजेची,आरोग्य,शिक्षण,रस्ते या मूलभूत सुविधा नाहीत.वर्षानुवर्षे सरकार,प्रशासन दुर्लक्ष करत आहे.तरी,वरील प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत .अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी शासनाकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...