भिमनगर येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा पाईप लाईन लिकिज झाल्या मुळे सर्व पाणी नागरिकांच्या घरात...


भिमनगर:आज सकाळी प्रभाग क्र. ९ भीमनगर जुने शहर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राच्या बाजूला पिण्याच्या पाईप लाईन लिकेज झाल्यामुळे बाजूला असलेल्या वस्ती मघे पूर्ण पाणी नागरिकांच्या घरात गेले होते.त्यानंतर पश्चिम झोन साहेब यांच्याशी संपर्क साधून,मैदान लागून असलेल्या मोठा सांडपाण्याचा नाला पाईप लाईन गेल्या कित्येक दिवसापासून लिकीज आहे,महानगरपालिकेचे अधिकारी कुंभकर्ण सारखी झोप घेऊन,सर्वसाधारण नागरिकांची झोप उडवत आहे,या परिसरातील सर्व नागरिक,टॅक्स,सर्व कर,भरल्यानंतर सुद्धा यांना,किती मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे या परिस्थितीचा सामना फक्त सर्वसाधारण नागरिकांनाच भोगावा लागत आहे,महानगरपालिकेचे अधिकारी स्वतःचे खिसे गरम करत आहे व गरीब जनतेचे शोषण करत आहे,या वार्डातील नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे.या भागात लहान लहान मुले आहेत.वयोवृद्ध नागरिक आहेत अशा परिस्थितीमुळे डासांचा प्रश्न निर्माण होत आहे.त्या मुळे नागरिकांची प्रकृती धोक्यात आली आहे याला जिम्मेदार महानगरपालिका आहे,झोपेचं सोंग करणाऱ्या अकोला महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो‌ व हे काम लवकरात लवकर करण्यात नाही आले तर आंदोलन छेडण्याचा सुद्धा इशारा आम्ही देतो,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...