फळबागांचे नुकसान करणार्‍यावर कारवाई करा


मौजे चऱ्हाटा तालुका जिल्हा बीड येथील सर्वे नंबर 4 मधील जमिनीवरील गोरगरिबांच्या फळबागांवर गाव गुंडांनी जेसीबी ट्रॅक्‍टरच्या साह्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी दि.5 जुलै 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी बीड यांनी संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कारवाईबाबत पोलीस अधिक्षक बीड, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना पत्र दिले होते. या गोष्टीला 6 महिने होऊन सुद्धा अद्याप न्याय मिळाला नसून संबंधित प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येऊन नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच दलित समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावी नुकसान केल्याबद्दल जेसीबी ,मशीन ट्रॅक्टर मालकावर गुन्हे दाखल करण्यात यावे. 32 एकर गायरान जमीन मोजून देण्यात यावी, बौद्ध विहारासाठी जमीन देण्यात यावी आदी मागण्यांसाठी दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार असे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व तालुका अध्यक्ष शेख युनूस चऱ्हाटकर  यांनी पत्रकात म्हंटले आहे

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...