नांदेड जिल्ह्यात वर्ल्ड व्हिजनद्वारे बालविवाह आणि कोविड लसीकरणाबाबत जनजागृती



नांदेड( प्रतिनिधी)वर्ल्ड विजन इंडिया भोकर प्रकल्पाच्या वतीने ग्रामीण भागात विविध सामाजिक कार्य हाती घेतले असून नांदेड जिल्ह्यामध्ये ही आता बालविवाह प्रतिबंध व लसीकरणाबाबत प्रचार रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे


 नांदेड जिल्ह्यात विशेषत: बालसंरक्षणासाठी मोठी सेवा करीत आहे दि. २६ जानेवारी रोजी  मुख्य जिल्हा न्यायाधीश. श्रीकांत एल. आणेकर,  जिल्हा न्यायाधीश -१ के.एन. गौतम, . जिल्हा न्यायाधीश-२ एस. ई. बांगर , अति. सत्र जिल्हा न्यायाधीश, ए.आर. धामेचा , कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एन.डी. खोसे , तदर्थ जिल्हा न्यायाधीश . एस. बी . डिगे ,   जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव . राजेंद्र एस. रोटे, महिला व बालविकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख  व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  विद्या आळणे , वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी मा. श्यामबाबू पट्टापू  यांच्या हस्ते प्रचार रथाचे हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले . वर्ल्ड व्हिजनचे प्रकल्प अधिकारी श्याम बाबू पट्टापू यांनी सांगितले की, दोन प्रचार रथ नांदेड जिल्ह्यात 11 दिवस फिरणार आहेत. मुलांनी कोविड लसीकरण करणे आणि बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आणि वर्ल्ड व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करण्यात येत आहे . युनिसेफ , वर्ल्ड व्हिजन आणि आरोग्य विभागासह 100% लसीकरणाच्या दिशेने काम करत आहेत. बालविवाह व बालसुरक्षा या पोस्टरांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले . जिल्हा न्यायाधीशांनी वर्ल्ड व्हिजन सेवांचे कौतुक केले करून या उदात्त कार्यासाठी अभिनंदन केले. उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा चाइल्डलाइनचे . डॉ. पि.डी.जोशी पाटोदेकर व चाईल्ड लाईनचे कर्मचारी व जिल्हा बाल संरक्षण कार्यालयातील कर्मचारी व वर्ल्ड व्हिजन कर्मचाऱ्यांनी सादरीकरण केले.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...