नाना पटोले यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल धाराशिव जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा ने मारले जोडो..



उस्मानाबाद प्रतिनिधी रितेशकाका चव्हाण 


काँग्रेसचे प्रदेध्याध्यक्ष नाना पटोले नीं भारत देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या भूमीत पंतप्रधानांचा जाहीररीत्या एकेरी उल्लेख? मारहाणीची  भाषा? हीच काँग्रेस संस्कृती का? 

असा प्रश्न जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजे निंबाळकर यांनी उपस्थित केला .

नाना पटोलेंनी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्यावर केलेलं वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबाबत अशा प्रकारे गरळ ओकण्याची महाराष्ट्राची संस्कृती मुळीच नाही. मात्र तुमचा आणि संस्कृतीचा दूर-दूरपर्यंत संबंध असेल, असं वाटत नाही. 


'उचलली जीभ लावली टाळ्याला' असा कारभार माजवून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम पटोले करत आहेत. देशाच्या पंतप्रधानांवर एका राज्याचा कसलेही कर्तृत्व नसलेला अतिशय सामान्य नेता अशा अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करतो, तिथेच यांची आणि यांच्या पक्षाच्या संस्कारांची उंची कळते. 

मोदीजींचे कर्तृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ठेच पोहोचवणे तुमच्या दिल्लीतील पक्षप्रमुखांनाही जमलं नाही, कारण त्यांचे कार्यच तितके महान आहे. त्यांच्या नखाचीही सर नसणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याला तरी याची जाणीव असायला हवी. पटोलेंच्या या वक्तव्याचा धाराशिव भाजयुमो कडाडून निषेध केला .

आपले संस्कार उघडे पाडणाऱ्या पटोलेंनी मोदी जींची जाहीर माफी मागायलाच हवी. आम्ही कधीही मारण्याची भाषा करत नाही तर केवळ राष्ट्रासाठी मरण्याची भाषा करतो कारण आम्हाला अटल जी यांचे संस्कार लाभले आहेत.  राजकारणात पक्षभेद आणि मतभेदही असतातच. राजकीय मतभेद असूनही ते वैयक्तिक पातळीवर न आणण्याची असंख्य उदाहरणं महाराष्ट्रात आहेत. त्याच महाराष्ट्राच्या भूमीत पंतप्रधानांचा जाहीररीत्या एकेरी उल्लेख? मारहाणीची  भाषा? हीच काँग्रेस संस्कृती का

नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव ने  आक्रमकपणे निषेध दर्शवत विजयवंत जयस्वाल  पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन उस्मानाबाद यांना या वेळी निवेदन  हि  दिले.

यावेळी  जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.पवार प्रशांत, शहर अध्यक्ष राहुल काकड,उपनगराध्यक्ष  अभय इंगळे,देवा नायकल ,शेख खालिद ,सुजित साळुंके, दाजीप्पा पवार,ओम नाईकवाडी , कुलदीपसिंह भोसले ,लक्ष्मण माने,बालाजी जाधव,देवकन्या गाडे , गणेश एडके ,संदीप इंगळे, प्रीतम मुंडे, सुरज शेरकर,राज निकम, हिम्मत भोसले, सुरज शेरेकर, विशाल पाटील,सलमान शेख ,प्रसाद राजमाने, जगदीश जोशी, सुनिल पुंगुडवाले, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, मारूती गवळी, अमित कदम, सागर दंडनाईक, रोहित देशमुख ,मेसा जानराव व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...