उपोषणकर्ते सुशिलकुमार पावरा यांची तब्येत बिघडली, खाजगी रूग्णालयात उपचार*..


उपोषण दरम्यान डोळ्यांतून अश्रू


*🟧"मरते दम तक लढेंगे"चा निर्धार*


*🔲दापोलीच्या गटविकास अधिका-यामार्फत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना पाठपुरावा* 


 दापोली: आपल्या न्याय मागण्यासाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दापोली येथे गेल्या काही दिवसांपासून उपोषण छेडले आहे. मात्र उपोषण करताना त्यांची तब्येत अचानक  बिघडली, त्यामुळे दापोलीच्या  एका खाजगी रूग्णालयात रात्री 8 वाजता त्यांना उपचारासाठी  दाखल करण्यात आले.डाॅक्टरने तपासणी करत इंजेक्शन व औषधे देऊन काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तरीही सुशिलकुमार पावरा यांनी आपले 192 वे उपोषण दापोली येथे सुरूच ठेवले आहे.उपोषण दरम्यान त्यांना रडू आले.मात्र काही भावनीक गोष्टीबाबत त्यांनी बोलण्यास टाळले. उपोषण करताना माझी तब्येत बरेचदा बिघडली मात्र मी अशा साध्या गोष्टींना घाबरत नाही. माझे ध्येय निश्चित केले आहे.  जोपर्यंत दोषी व बोगस शिक्षण विस्तार अधिका-यांवर कारवाई होत नाही व मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून हटणार नाही, असा निर्धार उपोषणकर्ते जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे   शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त  केले आहे."हम मरते दम तक लढेंगे!" असेही यावेळी सुशिलकुमार पावरा यांनी सांगितले आहे.दोषी,भ्रष्टाचारी,बोगस अपंग प्रमाणपत्रधारक विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्री धारक व दोषी श्री.नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच दोषारोपीत  तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या वर सुद्धा कारवाई करा  व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी  दापोली येथे 22 व्या  दिवशीही उपोषण  सुरूच ठेवले आहे. 

             विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22,000/ रूपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे,स्वत:कुठल्याही प्रकारे अपंग नसून खोटे अपंग प्रमाणपत्र मिळवून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक करणे, षडयंत्र प्रकरणात स्वत:ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड पेपरवर जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे,जाणीवपूर्वक शिक्षकांचा पगार न काढणे इत्यादीं गंभीर  प्रकरणात दोषी ठरले आहेत. तसा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी दापोली, मा.गटविकास अधिकारी गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 04/10/2018 रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. त्यांच्या विरोधातल्या दिनांक 04/07/2018 व दिनांक 29/10/2018 रोजीच्या दोन्ही चौकशीत चौकशी समितीने विजय दाजी बाईत यांना दोषी ठरवले आहे. 

         नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची डिग्री शिक्षण विस्तार अधिकारी पदाधिकारी अवैद्य ठरविण्यात आली आहे. तसा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार जिल्हा परिषद रत्नागिरी  यांनी दिलेला आहे. तसेच नंदलाल शिंदे हे महिला कर्मचा-यांचा छळ करणे,अनेक शिक्षकांना त्रास देणे व बोगस डिग्रीत दोषी ठरले असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

         माझ्या प्रकरणात जिल्हा परिषद रत्नागिरीला 2 लाख दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधित  बोगस विस्तार अधिका-यांची चौकशी होऊन त्यांना  दोषी ठरविण्यात आले आहे. तरी जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन हे बोगस विस्तार अधिका-यांना पाठीशी घालत आहे.जोपर्यंत बोगस विस्तार अधिका-यांवर कारवाई होऊन मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषणापासून हटणार नाही, असा निर्धार  उपोषणकर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी केला आहे.

         दरम्यान दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.एम.दिघे यांनी आपल्या दिनांक 13 जानेवारी 2022 रोजीच्या पत्रान्वये रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन.पाटील यांना सुशिलकुमार  पावरा यांच्या उपोषणाबाबत कळविले आहे.श्री. पावरा यांचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी आपणास सादर करण्यात येत आहे.तसेच सदर गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांचे  पत्र उपोषण कर्ते सुशिलकुमार पावरा यांना पोस्टाद्वारे  प्राप्त झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...