हिंगोली शहरात पहिल्यांदाच मराठा शौर्य दिन साजरा.



हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवप्रेमी मंडळीकडून मराठा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, असा शौर्यदिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे, या कार्यक्रमात पानिपत युद्धात शहीद झालेल्या मावळ्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थीत सर्व मान्यवर...

पानिपत....१४ जानेवारी १७६१....मराठी माणसाच्या मनावर कोरली गेलेली तारीख..संपूर्ण महाराष्ट्रात असा एकही समाज नाही, अशी एकही भावकी नाही ज्यांचे कोणी पानिपतावर लढले नाही.. क्वचितच एखादी भावकी असेल, क्वचितच एखादा पाव्हणा नातेवाईक असेल ज्याला पानिपतचे सुतक लागले नसेल. कोवळ्या वयाची तरणी ते वयोवृद्ध, अर्धपोटीही लढले.. युध्दाचा निकाल काय लागला याच्या पेक्षाही, कोण आणि कोणत्या परिस्थितीत कसे लढले याला नक्कीच एक वेगळे महत्व आहे... मनात खूप काही असते लिहिण्यासाठी, परंतु शब्द प्रत्येक वेळी साथ देत नाहीत..लाखों पानिपत वीरांना माझे नम्र अभिवादन.....

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...