दिनांक : 03/01/2023
भोकर ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. नीलकंठ भोसीकर यांनी आज दिनांक 03/01/2023 रोजी भेट दिली आहे. तेंव्हा भोकर ग्रामीण रुग्णालय येथील औषधी तुटवडा, सिटीस्कॅन, सोनोग्राफी नियमित सुविधा करणे व इतर मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनावर पत्रकार विजय मोरे, राहुल सोनकांबळे, गंगाधर नक्कलवाड, सतीश भवरे आदीच्या सह्या आहेत.
यावेळी प्रत्यक्ष बोलून चर्चा केली. सर्व सुविधा मिळतील यांची हमी दिली. सहकार्य करण्याचे आव्हाहन केले.