माधव पाटील सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा..केला


IMG-20230102-WA0217

भोकर - (प्रतिनिधी) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सक्रिय युवा नेते तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव पाटील सूर्यवंशी यांचा  वाढदिवस काल (दि. 2 जाने)विविध कार्यक्रम आयोजित करून  साजरा करण्यात आला.

मौजे बोरगाव येथील शाळेय समिती अध्यक्ष तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माधव पाटील सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त  मौजे बोरगाव येथे काल ( दि ०२( भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र मुसळे, हाडोळीचे सरपंच प्रतिनिधी तथा ओबीसी समाज नेते माधव अमृतवाड, युवा नेता आदिनाथ चिंताकुठे आदी प्रमूख काँग्रेस पक्षाच्या मान्यवराह विविध पक्षातील मित्रमंडळी व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप तसेच भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप आदी समाजपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान तालुका व शहरातील अनेक मान्यवरासह ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन दीर्घायुष्यासाठी अभिष्टचिंतन केले. सदर भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव पाटील मित्र मंडळ व गावकऱ्यांनी विशेष प्रयत्न केले


Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...