बोगस शिक्षकांवर गुन्हा दाखल तर बोगस शिक्षण विस्तार अधिका-यांवर गुन्हा दाखल का नाही?*


बोगस प्रमाणपत्रधारक शिक्षण विस्तार अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा: सुशिलकुमार पावरा..

बोगस पदव्या पैशांनी वाटणारा दलाल मला माहिती आहे: सुशिलकुमार पावरा.



दापोली: बोगस प्रमाणपत्रधारक  शिक्षण विस्तार अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे एका निवेद्नाद्वारे केली आहे. 

               निवेदनात म्हटले आहे की, आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीत शिक्षण विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असणारे नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची प्रमाणपत्रे चौकशीत खोटी सिद्ध झाली आहेत. नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांची आग्रा विद्यापिठाची पदवी " हिंदी शिक्षण  पारंगत" ही परीक्षा विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी विहीत केलेली व्यवसायिक पात्रता म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असा चौकशी अहवाल तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नागिरी किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सादर केलेला आहे.शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसतानाही नंदलाल कचरू शिंदे यांनी खोट्या पदवीचे


प्रमाणपत्राआधारे  जिल्हा परिषद मध्ये  नोकरी बळावली आहे.पगार व अनेक शासकीय आर्थिक फायदे घेऊन शासनाची फसवणूक केली आहे. तसेच विजय दाजी बाईत तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांचे खोटे अपंग प्रमाणपत्र चौकशीत सिद्ध झाले आहे. तसा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली, सहाय्यक गटविकास अधिकारी गुहागर व शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी ह्या त्रिसमीतीय सदस्य समितीने दिनांक 10 ऑक्टोबर 2018 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केलेला आहे. विजय दाजी बाईत  स्वत: कुठल्याही प्रकारे अपंगत्व नसताना खोटे अपंग  प्रमाणपत्र बाळगून अनेक शासकीय योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केली आहे.

           वरील दोन्ही शिक्षण विस्तार अधिकारी हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी 22 हजार रुपये घेणे,कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करणे, शिक्षक सुशिलकुमार पावरा यांच्या विरोधात रचलेल्या षडयंत्र प्रकरणात स्वतःला वाचविण्यासाठी आठ आदिवासी शिक्षकांकडून जबरदस्ती ने स्वत लिहून ठेवलेल्या पत्रावर व बान्ड जबरदस्तीने दमदाटी करून सह्या करवून घेणे, खोटे अपंग प्रमाणपत्र बाळगून शासनाची फसवणूक करणे, खोटी पदवी बाळगून शासनाची फसवणूक करणे, महिला कर्मचा-यांचा छळ करणे,शिक्षकांचा पगार जाणीवपूर्वक न काढणे इत्यादीं गंभीर प्रकरणातही दोषी ठरले आहेत. या शिक्षण विस्तार अधिका-यांच्या विरोधात अनेक शिक्षक संघटना,शिक्षक कर्मचारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी इत्यादींचे रितसर तक्रारी आहेत.

        याचबरोबर इलाहाबाद या विद्यापिठातून पैशांनी विकत घेतलेल्या खोट्या पदवीआधारे अनेक शिक्षकांनी  मुख्याध्यापक ,पदवीधर, केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी  पदावर पदोन्नती मिळवली आहे. इलाहाबाद विद्यापीठातून पैशांनी विकत आणून खोट्या पदव्या शिक्षकांना वाटणारे दलाल सुद्धा माहिती पडले आहेत. अशांवर सुद्धा फौजदारी गुन्हा होणे गरजेचे आहे.

              टीईटीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणा-या बोगस शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे तर बोगस प्रमाणपत्र व पदवी सादर करणा-या बोगस शिक्षण अधिका-यांवर गुन्हा दाखल का केला जात नाही?  खोट्या प्रमाणाआधारे नोकरी बळकावणा-या व शासनाची फसवणूक करणा-या या शिक्षण विस्तार अधिका-यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा करून यांनी आजवर घेतलेले सर्व आर्थिक फायदे वसूल करावेत व यांना कायमचेच सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी इंदूराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...