वादग्रस्त वक्तव्याबद्दल राऊत यांचा औंढ्यात रिपब्लिकन युवा सेनेकडून निषेध..ऊर्जा मंत्र्यांना घोषणानी दिला शॉक

औंढा नागनाथ राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आंबेडकर कुटुंबावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा औंढ्यात बुधवारी दुपारी दोन वाजता रिपब्लिकन युवा सेनेकडून निषेध नोंदवत युवा प्रदेश अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली जुबान खीचो आंदोलन करून मंत्री राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व निषेधाचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्यामार्फत देण्यात आले. 


दरम्यान बुलढाणा दौऱ्यावर असताना राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर कार्यक्रमात आंबेडकर कुटुंबाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आंबेडकर कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आंबेडकर कुटुंबांना मांडणाऱ्या ९० टक्के जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे रिपब्लिकन युवा सेना प्रदेश कडून औंढ्यात तहसील कार्यालयाच्या गेटवर त्यांच्या विरोधात "जुबान खिचो आंदोलन" करून जोरदार घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील मंत्री नितीन राऊत यांच्या तोंडाला लगाम लावावा अन्यथा आंबेडकर कुटुंबाला मानणारी जनता रस्त्यावर उतरून

काँग्रेसविरोधात जन आंदोलन करून सरकार उलथवून टाकेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, मनोज मुळे,पंजाब राठोड,विनोद जोगदंड,यशवंत साळवे,गोरख खिलारे,नितीन गव्हाणे,अविनाश खाडे,सौरभ मुळे,गणेश गोडे,सुंदर मुळे,पंडित सूर्यतळ,सिद्धार्थ खिल्लारे,पप्पू गायकवाड, आदींची उपस्थिती होती त्या दरम्यान पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुवर्णा वाळके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गुरुपवार जमादार गणेश नरोटे गणेश गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 


छायाचित्र गजानन नाईक औंढा

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...