भोकर शहरात बस स्थानक समोर विश्रामगृह समोर वाढले अवैध व्यवसाय,अवैध धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब होतेय उद्ध्वस्त/


प्रशासन या बातमीची दखल घेणार  नाही.मला माहिती आहे पण सत्य आहे जाखणार नाही.

भोकर- भोकर शहरात गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि प्रशासन विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. शहरातील विश्रामगृह समोर.उड्डानपूला खाली मुख्य ठिकाण बस स्थानक समोर भागात सुरू असलेल्या या मटका अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना प्रशासांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पाणठेला,चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते.मात्र,आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे.पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़, यावर तरुणांनी उपाय शोधला असून, मटका पैसा लावून जादा पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत.मटका तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहे. या मटकाच्या नादी लागुण कित्येक तरुण दिवसभर आकडे मोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. शहरात बस स्थानक समोर.विश्रामगृह समोर उड्डाण पूलाच्या खाली.दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय लावलेले आहे.या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत.तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे असते.भोकर शहर खुलेआम मटका इतर अवैध व्यवसाय सुरू आहे.मात्र असे असतानाही या प्रशासन कडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष.पुरवावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...