भारतरत्न स्व. लता दीदींना राज्यस्तरीय संगीतमय श्रद्धांजली ..

 


अमरावतीमधील खाना खजाना लॉन येथे कौशल्य विकास व उद्योजकता विभाग अंतर्गत

निदेशक सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून भारतरत्न स्व. लता दीदींना  राज्यस्तरीय संगीतमय श्रद्धांजली व सांस्कृतिक मनोमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते

.सदर कार्यक्रम थाटात पार पडला. यासाठी कोल्हापूर, पुणे, नागपूर अशा विविध विभागातून हौशी कलाकार उपस्थित राहिले होते.

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व कलाकार एकमेकांना डिजिटल माध्यमातून भेटत असत. सर्वांची प्रत्यक्ष भेट व्हावी, वैचारिक व सांस्कृतिक देवाण-घेवाण,

शैक्षणिक प्रशिक्षणाबाबत  सखोल चर्चा व पर्यटन हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू होता.


 मागील दोन लाॅक डाऊनच्या काळात निदेशक, सहकारी, आप्तेष्ट, कर्मचारी हे सर्वजण   नैराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी एक संगीतमय थेरपी म्हणून व्हाट्सअप, "निदेशक सांस्कृतिक चळवळ", ब्लॉग व एनएससी ॲप या ग्रुपच्या माध्यमातून कराओके गीत गायन,नकला,सांगीतिक टिप्स, नाट्यक्षेत्र इत्यादी कलेशी निगडित गोष्टी या ग्रुपवर केल्या जातात.  सर्व विभागातून जवळपास 250 सहकारी यामध्ये जोडले गेले आहेत. ऑनलाईन प्रशिक्षणासोबतच आपल्या व्यवसायाशी निगडित अडीअडचणींची सोडवणूकही यामधून केली जात आहे. याचा खूप मोठा फायदा सहभागी सहकाऱ्यांद्वारे प्रशिक्षणार्थ्यांनाही झाला आहे.


नियोजित वेळेनुसार भेटीगाठी,चर्चा व सांगीतिक कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता सुरु होऊन रात्री दहा वाजेपर्यंत संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य निदेशक संघटनेचे मार्गदर्शक श्री.भोजराजजी काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस विनोदजी दुर्गपुरोहित सर, श्री. शिवाजी दुमने सर , श्री. मधुभाऊ उघडेसर, श्री.प्रेमानंद भैसारेसर, अमरावती विभागीय सचिव श्री.अनिल उंबरहांडे सर , संघटनेचे विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते या मान्यवरांच्या उपस्थित आपल्या अथक परिश्रमाने कार्यरत सांस्कृतीक ग्रुप संचालक व या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार श्री.सुरेन भांडे सर यांचे उत्कृष्ट नियोजन प्रकर्षाने जाणवले.या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व सत्कार शाल,श्रीफळ व विशेष NSC चे मानचिन्ह देऊन करण्यात आले. स्वर्गीय गानसम्राज्ञी लतादीदींना भावपूर्ण आदरांजली वाहून,सुमधुर जुन्या हिंदी, मराठी दर्जेदार गीतांचा नजराणा उपस्थित निदेशक बंधू-भगिनींनी सादर केला. यासोबत चार पिढ्यांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले आर. के.  म्युझिकल मेलडिजचे संचालक श्री. राजन भाई पछेल व  राजाभाऊ राऊत सर, गायक  यांचा यथोचित सत्कार केला. संपूर्ण रसिक मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाचा भरपूर आस्वाद घेऊन दाद दिली.  या संपूर्ण मनोमिलन सोहळ्यामुळे उपस्थित कलाकारांसह इतर सहकार्‍यांशी ऋणानुबंध आणखी घट्ट झाले.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...