आ. संतोष बांगर साहेब यांनी औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 - 22 वार्ड क्रमांक 3 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदीमा फातेमा यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन उपस्थितांशी साधला संवाद.


आज *हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब* यांनी *औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणूक 2021 22 वार्ड क्रमांक तीन मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदिमा फातिमा यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन उपस्थित मतदार बांधवांशी संवाद साधला* यावेळी *बोलताना आमदार बांगर म्हणाले की शिवसेना पक्ष सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून औंढा नागनाथ शहराच्या तसेच वार्ड क्रमांक 3 च्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार तांबोळी नदीमा फातेमा यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले* *तसेच तुमची कोणतीही अडचण असू द्या मी तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन  असा विश्वास आमदार बांगर साहेब यांनी उपस्थितांना दिला*.

         यावेळी जि. प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, श्रीरामदादा राठी,राजा भाऊ मुसळे, अनिल देव,मिन्हाज उल हसन, राजू नागरे, पंढरी मगर,नितीन होकर्णे,गंगाधरराव पोले,प्रमोद देव,राहुल दंतवार, सचिन राठोड,लल्ला देव व मोठ्या संख्येने मतदार बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...