आ.श्री.संतोषदादा बांगर साहेब यांनी औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सौ.ज्योती गणेश देशमुख आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुळशीराम जाधव यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी .

 


आ.श्री.संतोषदादा बांगर साहेब यांनी केले  शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन...


*आ.संतोष बांगर साहेब यांच्या झंझावाती प्रचार रॅली ने प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये संचारला भगवा झंझावात....!!!*


 *औंढा नागनाथ येथील वीरशैव कक्कया मंदिराचा सर्वांगीण विकास करणार*

              *- आमदार संतोष बांगर*


*हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.संतोष बांगर साहेब यांनी औंढा नागनाथ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ.ज्योती गणेश देशमुख आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुळशीराम जाधव यांच्या प्रचारार्थ घरोघरी जाऊन  मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या मतदार बंधू आणि भगिनींशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यांची आपुलकीने विचारपूस करत आपल्या वार्डाच्या व शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी आमदार बांगर यांनी औंढा नगर वासियांना केले यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी आमदार संतोष बांगर साहेब यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आमदार संतोष बांगर साहेब यांच्या प्रचार रॅलीने अवघा परिसर भगवामय झाला, यावेळी आमदार संतोष बांगर यांनी वीर शैव कक्कया मंदिराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले तसेच भक्तांची आई मंदिर आणि प्रभाग क्रमांक 10 मधील देवीचे  दर्शन घेतले आमदार संतोष बांगर साहेब यांच्या प्रचार रॅलीचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्तापासूनच सरकु लागली आहे* यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, श्रीराम दादा राठी, अनिल भाई देशमुख, अनिल देव, प्रमोद देव, विष्णू पवार, राम मुळे,गणेश देशमुख, दिलीप राठोड मनोज देशमुख, अनिल शिंदे,कपिल खंदारे, राजू नागरे, पंढरी मगर, नितीन होकर्णे, नागनाथ रेणके,शे.मिनाज,सचिन राठोड माधव गोरे, लल्ला देव व मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...