सावनेर-कामठी रोडची रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांचा जीव धोक्यात


सावनेर : सावनेर-तेलकामठी मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर लांबच लांब भेगा आणि डांबर उखडलेले दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याची योग्य देखभाल होत नसल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना अपघाताचा धोका निर्माण होत असून, रात्रीच्या वेळी परिस्थिती

आणखी गंभीर बनते.पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनचालकांचा अंदाज चुकून अपघात होण्याची शक्यता वाढते. अनेक दिवसांपासून रस्त्याची अवस्था अशीच असूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.*तेलकामठी–सावंगी या गावाशी प्रशासनाची नेमकी काय दुश्मनी आहे, हेच समजत नाही*रस्त्याची दुरवस्था झालेली असतानाही प्रशासनाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत, भेगा दुरुस्त कराव्यात आणि संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...