कासराळी येथे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन.

 


 बिलोली - देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दि.12 जून रोजी विविध आजारावर मोफत व भव्य आरोग्य शिबीर बिलोली तालुक्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय कासराळी येथे वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सरस्वती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी  जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आला आहे. 


 सदरील शिबीरात डोळ्यांची मोतिबिंदू तपासणी, दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनकार्ड धारकांना मोफत शस्त्रक्रिया सुविधा, गरोदर माता, महिलांचे आजार मोफत तपासणी व औषध गोळ्यांचे वाटप, हाडांच्या आजारावर निदान व उपचार, चेहरा, त्वचा रोगावरील तपासणी व उपचार, मानसिक आजार व व्यसनमुक्ती, लैंगिक समस्यांचे निवारण, लहान बाळांच्या आजारावरील तपासणी व उपचार, रक्तदाब, लकवा, फुफ्फुसांचे आजार, मूत्रपिंड आजारांवरील तपासणी व उपचार, स्त्रीयांच्या मासिक पाळीतील व गर्भ पिशवीच्या आजारांवरील निदान व उपचार, स्त्री वंध्यत्व निवारण व उपचार आदी आजारावर मोफत तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहे. या शिबिरासाठी ऑर्थोपेडिक. ट्राॅमा व स्पाईन सर्जन डॉ.इरवंत पल्लेवाड, बालरोग तज्ञ डॉ. सचिन आन्नेवार, मधुमेह व थायरॉईड तज्ञ डॉ. जयश्री बोडके, मानसोपचार व्यसनमुक्ती व लैंगिक समस्या तज्ञ डॉ. रोहीत ठक्करवाड, ह्रदयरोग तज्ञ व जनरल फिजिशियन डॉ. हेमंत लखमावाड, नेत्ररोग तज्ञ डॉ. शाम लखमावार,स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.संपदा ठक्करवाड(पल्लेवाड) त्वचा रोग व सौंदर्यशास्त्र तज्ञ डॉ. शिल्पा लखमावाड, रोग निदान शास्त्र तज्ञ (पॅथॉलॉजीस्ट) डॉ. नागेश शाहू आदी तज्ञ डॉ उपस्थित राहणार आहेत. तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरस्वती प्रतिष्ठान कासराळी व माजी सरपंच अरविंद ठक्करवाड यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...