गुरूजीला फसविणा-यांना परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही :सुशिलकुमार पावरा.



रत्नागिरी   : गुरूब्रह्मा गुरूविष्णू: गुरूदेवो महेश्वर!गुरू:साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरूवे नम:!! साक्षात परमेश्वराला सुद्धा गुरू करावा लागला. गुरूची महिमा ही अपार आहे.मी सुद्धा एक गुरूजी आहे. मला खोट्या गुन्ह्यात अडकविणा-या व माझ्या विरोधात षडयंत्र रचणा-या अधिका-यांना व जे कोणी षडयंत्रात शामिल असतील त्यांना परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही. माझा परमेश्वरावर विश्वास आहे. परमेश्वर दोषींना त्यांच्या पापांची सजा नक्कीच देईल.परमेश्वर मला एक दिवस न्याय देईल.या आशेने माझे उपोषणाचे सत्र सुरूच आहे. अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आपले 203 वे उपोषण करताना दिली आहे. 

                    दोषी व बोगस शिक्षण विस्तार अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करा   व माझी उर्वरीत 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा तसेच 28 मागण्यांच्या तात्काळ पूर्तता करा .या मागणी साठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे  शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी  आपले 203वे उपोषण दापोली पांगारवाडी  येथे पुन्हा छेडले आहे. उपोषणाचे निवेदन तहसीलदार दापोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना दिले आहे. निवेदनाची पोहच घेऊन आपले उपोषण सुरूच ठेवले आहे.

             दरम्यान  गटविकास अधिकारी दापोली आर.एम.दिघे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांना पावरा यांच्या उपोषणाबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार केला आहे.जोपर्यंत मला न्याय मिळत नाही व दोषी बोगस विस्तार अधिका-यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा  मी सुरूच ठेवणार आहे.  अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...